सुप्रियाताईंना 'मसणात जा' म्हणणाऱ्या चंद्रकांतदादांचा माफीनामा

सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.
chandrakant patil, supriya sule
chandrakant patil, supriya sulesarkarnama

मुंबई : 'तुम्ही कशाला राजकारणात राहता, घरी जा आणि स्वंयपाक करा, खासदार आहात ना तुम्ही ! कळत नाही का ? एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही का ?, एक शिष्टमंडळ पाठवायचे, आता घरी जाण्याची वेळ झाली आहे,' अशी टीका भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्यावर केली होती. त्यानंतर पाटलांवर आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीका केली होती. (supriya sule news update)

या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटलांनी महिला आयोगाला पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संताप व्यक्त केला होता.

'तुम्ही दिल्लीत जा, नाही तर मसणात जा, पण शोध घ्या आणि आरक्षण द्या' अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती

chandrakant patil, supriya sule
पदमसिंह पाटलांनी शरद पवारांना दिलेली साथ मी आयुष्यभर विसरणार नाही !

महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चंद्रकांतदादांनी पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. "माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो," असे चंद्रकांत पाटील यांनी रुपाली चाकणकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

रुपाली चाकणकरांना लिहिलेल्या पत्रात चंद्रकांत पाटील म्हणतात..

आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap,सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.

माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com