सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? चंद्रकांतदादांचा सवाल

तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल ?
Chandrakant Patil,Sanjay Raut
Chandrakant Patil,Sanjay Raut Sarkarnama

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje ) यांनी अखेर शुक्रवारी राजकीय लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. या मुद्दांवरुन अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या विषयावरुन खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्यात वाद रंगला आहे.

कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. "संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, भाजपने त्यामध्ये चोंबडेपणा करू नये," असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. त्याला चंद्रकांतदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्य ज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल ? आणि हो... सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला ?" असा सवाल टि्वट करीत चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

Chandrakant Patil,Sanjay Raut
काँग्रेसच्या विजयासाठी तीन आमदारांची कसोटी

"छत्रपती शिवाजी महाराज हे कुणाच्या मालकीचे नाहीत. महाराज संपूर्ण विश्वाचे आहेत. 42 मतांचा प्रश्न होता, राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा हात धरावा लागतो. यापूर्वी पक्षप्रवेश केलेला नाही का ? अशी विचारणा करत आम्हाला तोंड उघडायला भाग पाडू नका, संभाजीराजे यांनी काल मन मोकळं केलं, आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे," असे राऊत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले.

संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीका केली होती. आता त्यांचे वडिल छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांना खडे बोल सुनावले आहेत. छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आला असता तर विषय वेगळा असता, पण तसं काही झालेलं नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली असेही शाहू महाराज यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com