..मग नवाब मलिक यांनीही राजीनामा द्यायला हवा!

नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा,'' अशी मागणी आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली,

..मग नवाब मलिक यांनीही राजीनामा द्यायला हवा!
नवाब मलिक, प्रवीण दरेकर सरकारनामा

मुंबई : ''लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणात योगी सरकारने कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जात आहे. मग राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती, त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यायला हवा,'' अशी मागणी आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, या पार्श्वभूमीवर दरेकर बोलत होते.

नवाब मलिक, प्रवीण दरेकर
`मी पुन्हा येईन` वरून पवारांची फडणवीसांवर चौफेर टोलेबाजी!

दरेकर म्हणाले, ''आजही जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. पवार साहेबांना आपण चार वेळ मुख्यमंत्री आहेत याची आठवण करून द्यावी लागते. याचा अर्थ राष्ट्रवादीला भाजपबाबत पोटशूळ किती आहे हे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांना असे वाटले होते महाराष्ट्र म्हणजे आमची मक्तेदारी आहे, मात्र आज देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व या राज्यात उभे राहिले याचा पोटशूळ या लोकांना होत आहे,''

साखर कारखानदारी, सहकार हे राज्याचे कधीकाळी वैभव होते, त्यावेळी हिताचे राजकारण होत होते. आज हीकारखानदारी शेतकऱ्यांच्या हिताची आहे की कारखानदारांसाठी आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवाब मलिक, प्रवीण दरेकर
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल

'शून्य रुपयात कारखाना हडप करण्याचे काम सुरू आहे. ते शोधण्याचे काम या तपास यंत्रणा करीत आहेत. शेतकऱ्याच्या हिताचे राजकारण केले पाहिजे. त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत

ईडीचा गौरवापर, केंद्रीयत तपास यंत्रणांचा गैरवापर होतो असे म्हणतात, मला देखील नोटीसा आल्या ती काय प्रेम भावना होती का?'' असा सवाल दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

''मी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो होतो. शेतकऱ्याला हेक्टरी 50 हजार मिळाले तर आम्ही त्याचे स्वागत करू", असे दरेकर म्हणाले.

शरद पवार म्हणाले, ''फडणवीस यांचे काल मी भाषण ऐकलं. त्यांनी सांगितली मी सत्तेवर नाही असं मला वाटत नाही. ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्यामते ते अजूनही मुख्यमंत्री आहेत. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांना अजूनही आपण सत्तेतच आहोत असे वाटते. पाच वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अजूनही त्यांना मुख्यमंत्रीपदी असल्याचे विस्मरण झाले नाही. ही जमेची बाजू आहे. ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी चारवेळी मुख्यमंत्री होतो हे माझ्या लक्षातही नाही. ही कमरतता मी कबुल करतो.''

''फडणवीस निवडणुकीपासून नेहमीच आपल्या भाषणात 'मी पुन्हा येईल,' असे म्हणतात. यावरुन सत्तेत येण्यासाठी या लोकांच्या वेदना किती खोल आहे, हे लक्षात येईल. पण सत्ता येते अन् जाते त्याचा कधी विचार करायचो नसतो. सत्तेत असताना सत्तेचा वापर लोकांच्या चांगल्या गोष्टीसाठी करायला पाहिजे. पण सत्ता नसेल तर विरोधी पक्षनेता म्हणून काम करणं सोपं जातं. पदावर नसताना लोकांना तक्रारींचे विश्लेषण करण्याची संधी असते. याचा आनंद मला नेहमी मिळाला. त्यातून मला शिकायला मिळते,'' असे पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.