BJP News : जुन्या नेत्यांना भाजपची साद ; पक्ष कामापासून दूर ठेवलेल्या नेत्यांवर महत्वाची जबाबदारी

BJP Old leaders in election campaigning news update : मधु चव्हाण यांच्याकडे प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी भाजपने दिली आहे.
BJP
BJPSarkarnama

BJP Old leaders in election campaigning news update : येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नव्या- जुन्या नेत्यांची फळी उभी करणार आहे. मागील काही वर्षे पक्षामध्ये सक्रिय नसलेल्या नेत्यांना भाजप पुन्हा सक्रिय करणार आहे. त्यासाठी भाजपने आपल्या जुन्या नेत्यांना निवडणूक प्रचाराच्या रिंगणात उतरण्यासाठी साद घातली आहे.

नव्या दमाच्या पिढीसोबत भाजपने अनुभवी नेत्यांनाही मैदानात उतरविण्याची योजना आखली आहे. गेली अनेक वर्षे भाजपसाठी निष्ठेने काम केलेल्या पण मागील काही दिवस पक्ष कामापासून स्वतःला दूर ठेवलेल्या नेत्यांवर भाजप देणार महत्वाची जबाबदारी देणार आहे.

BJP
MNS News : गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित ; राज ठाकरे कोणत्या मुद्यांवर संबोधित करणार : 'मी हिंदू म्हणून अंगावर जाईन.."

स्व.उत्तमराव पाटील अमृतकुंज अभियानासाठी भाजपचे ज्येष्ठ नेत्यांवर महत्वाची जबाबदारी दिली आहे. यात मधु चव्हाण यांच्याकडे प्रदेश संयोजक पदाची जबाबदारी भाजपने दिली आहे.

2024 विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच सांगितलं. ते भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास वर्गास बोलते होते. यावेळी बावनकुळे यांनी सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

भाजपने 240 जागा लढवण्याची तयारी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 48 जागा येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे लवकरच समजेल.

BJP
BJP Mission 2024 : "मौत का सौदागर" ते "चायवाला" ; BJP चे असे आहे २०२४ चे टार्गेट..

शिंदे गटाचे सध्या 40 आमदार असून काही अपक्ष आमदारही त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या जागा वगळता भाजप शिंदे गटासाठी जादा जागा सोडणार नाही, असे बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन दिसून येत आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भाजपने मिशन २०२४ साठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (२०२४) आपल्या काय योजना आहेत, हे भाजपने एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे.अँनिमेटेड व्हिडिओ भाजपने समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. 'मुझे चलते जाना है...'असे या व्हिडिओला शीर्षक दिले आहे. साडेचार मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात केलेल्या विविध कामाचा आढावा या व्हिडिओत घेण्यात आल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com