राज ठाकरेंच्या मुलाला मंत्रिपद मिळणार? शिंदे गट-भाजप धक्का देण्याच्या तयारीत

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शह देण्यासाठी भाजपची ही खेेळी असल्याची चर्चा.
Amit Thackeray Latest Marathi News
Amit Thackeray Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप इतर मंत्र्यांची शपथ झालेली नाही. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत भाजपने मनसेला ऑफर दिली दिल्याचे वृत्त आहे. शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचे महत्व कमी करण्यासाठी हे मोठं उचललं जाऊ शकते. (Amit Thackeray Latest Marathi News)

अमित ठाकरे यांना मंत्रिपदाच्या ऑफरबाबतचे वृत्त 'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिलं आहे. अमित ठाकरे हे सध्या राजकारणात बरेच सक्रीय आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आजारपणामुळे सध्या घराबाहेर पडणे शक्य होत नाही. पण अमित ठाकरे सतत दौऱ्यावर असतात. पण सध्या ते विधिमंडळाचे सदस्य नाहीत. तरीही त्यांना भाजपकडून (BJP) मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Amit Thackeray Latest Marathi News
फडणवीस-ठाकरे भेटीनं सत्तानाट्यात ट्विस्ट येणार? आज दुपारी शिवतीर्थावर चर्चा

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ठाकरे कुटुंबीयांना धक्का देण्यासाठी भाजपकडून ही नवी खेळी खेळली जाऊ शकते. शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा आता शिवसेनेत वरचष्मा आहे. शिवसेनेची सुत्रं त्यांच्यात हातात येण्याची शक्यता आहे. त्यांना शह देण्यासाठी अमित ठाकरे यांना थेट मंत्रिमंडळात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.

अमित यांच्या माध्यमातून थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नसल्याचे मनसे नेत्यांकडून सांगितले जात आहे. भाजपकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनीही ही ऑफर धुडकावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.

Amit Thackeray Latest Marathi News
Maharashtra Rain News : अतिवृष्टीचे 89 बळी; 27 जिल्ह्यांना बसला तडाखा

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संभ्रम

शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेऊन दहा दिवस उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. केवळ दोघांकडून राज्याचा गाडा हाकला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेच्या कारवाईबाबत सुरू असलेल्या सुनावणीमुळे विस्तार रखडल्याची चर्चा आहे. सध्या राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी बिकट स्थिती निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in