BJP News : पक्षाची बाजू मांडण्यासाठी भाजपाकडून प्रवक्त्यांची मोठी फौज!

BJP News : विषयारूप तज्ञ म्हणून पॅनेलिस्ट म्हणून 31 जणांची नियुक्ती करण्यात आली.
BJP News ; chandarshekhar News
BJP News ; chandarshekhar News Sarkarnama

BJP News : भारतीय जनता पक्षाच्या मीडिया विभागांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नेमणुकांसंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एक पत्र काढण्यात आले आहे. या पत्रात भाजप मीडिया विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीची करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नवनाथ बन यांच्याकडे भाजपच्या माध्यम प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे तर, केशव उपाध्ये यांची मुख्य प्रवक्ते, विश्वास पाठक व अजित चव्हाण यांची सह मुख्यप्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली.

BJP News ; chandarshekhar News
Chinchwad : पोटनिवडणूक चिंचवडची, फटका पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांना...

या नियुक्त्यांसोबतच इतर नऊ जणांची प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. विषयानुरूप तज्ञ म्हणून इतर ३ जणांचीही पॅनेसिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आमदार राम कदम, माजी मंत्री राम शिंदे, आमदार अमित साटम, भालचंद्र शिरसाट, शिवराय कुलकर्णी, श्वेता शालिनी, गणेश खणकर, अॅड राजीव पांडे, प्रेरणा होनराव यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

BJP News ; chandarshekhar News
Shahajibapu Patil : बारामतीच्या कृषिप्रदर्शनाची शहाजीबापूंना भुरळ : म्हणाले, "सांगोल्याचा डाग पुसून.."

याशिवाय पॅनेलिस्ट म्हणून ३१ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार अनिल बोंडे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रवीण दटके, आमदार सिद्धार्थ शिरोळेआमदार श्वेता महाले, गणेश हाके, अवधूत वाघ ही प्रमुख नावे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in