BMC Election : मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपचा नवा फॅार्म्युला, लोढा अॅक्शन मोडमध्ये

BMC Election : . मुंबईचे उपनगरचे पालकमंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
BJP
BJP Sarkarnama

मुंबई : मुंबई महापालिका (BMC) म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जाते. त्यामुळे आता हीच सोन्याची कोंबडी मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळेच आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election) रणनीती आखण्यात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने नवा फॅार्म्युला तयार केला आहे. मुंबईचे उपनगरचे पालकमंत्रीपद मिळताच मंगलप्रभात लोढा अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंगलप्रभात लोढा यांनी ‘मंत्री तुमच्या दारी'या उपक्रमाची सुरवात केली आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी आता ‘पालकमंत्री तुमच्या दारी‘हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

BJP
Maratha Reservation : तानाजी सावंत, माफी मागा ; मराठा मोर्चा संतप्त, राज्यात एकाही मंत्र्याला फिरु देणार नाही..

मुंबई आणि उपनगरतील सर्व महापालिका वॅार्डात भाजपचे नेते जनता दरबार घेणार आहेत. जनता दरबारातून मु्बईकरांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थेट जनतेशी जुळवून घेण्यासाठी भाजपने हा फॅार्म्युला वापरण्याचे ठरवलं आहे. त्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात पालकमंत्र्यांचा जनता दरबार होणार आहे. ॲाक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हा जनता दरबार भरणार आहे.

उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे देखील मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी घेताना दिसत आहे. देशातील आकाराने लहान असलेल्या राज्याहून अधिक बजेट असलेल्या मुंबई महानगर पालिकेवर कुणाची सत्ता येईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

"कित्येक वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण, त्यांनी पालिका ‘धुऊन’ काढली, नागरिकांचे शोषण केले. महापालिकेच्या कामांमध्ये लाचखोरी झाली. जागतिक कीर्तीचे शहर बकाल केले. मुंबईचा विकास राज्यात भाजपची सत्ता असतानाच झाला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईसाठी काहीही केलेले नाही, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांनी नुकतीच केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in