
डोंबिवली : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राहुल गांधी या वादावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. डोंबिवली मध्ये एका कार्यक्रमासाठी नारायण राणे आले होते. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
भारत जोडो यात्रा सुरू असून राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले आहे, यावर राणे म्हणाले, "एवढे वर्ष देशात काँग्रेस सत्तेत असल्यानंतर आता त्याला भारत जोडो करावसं वाटतं. याच्या मागे किती लोक सामील आहेत. महाराष्ट्रात आले तरी नवीन लोकं त्यांच्या सामील होत नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या सर्व पक्षांची मिळून भारत जोडो यात्रा सुरू आहे, पण यात्रेत ते सामील नाहीत. या तीन पक्षांची मन जुळली नाहीत, सत्तेसाठी ते फक्त एकत्र आलेले आहे आणि हे चित्र दिसून आलं आहे. यामध्ये त्यांना फारसा यश मिळणार नाही. पंतप्रधान मोदी हे विधायक कार्य करत असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे मंत्री राणे म्हणाले.
नारायण राणे म्हणाले, "आदित्य ठाकरे यांच्यावर मी कधी काय बोलत नाही, ते बालिश आहे, कधी कोणाला भेटायला जातील. सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते ? याचा आदित्यला गंध नाही. ना त्याला माहित ना त्याचे वडील उद्धव ठाकरे यांना माहीत. आपले फोटो येतील म्हणून ते भारत जोडो यात्रेत गेले. राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल बोलले याची कोणत्याही प्रकारची चीड त्यांना आलेली नाही,"
'बदल्याची भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा ऐकली,' असे विधान राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे, असा प्रश्न विचारताच 'जाऊ दे त्यांचे नाव नका घेऊ, पहिले बदले घेतले जायचे पण दाखवले किंवा सांगितले जायचे नाहीत. गपचूप बदले घेतले जायचे. त्यांना नाव पाहिजे तर सांगा मी जाहीर करतो असे कित्येक बळी आत्तापर्यंत गेले आहेत," असे राणे म्हणाले.
मुंबई गोवा चौपदरी रस्त्याचे काम राखडल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत असून तो रस्ता केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी संगीतले की, या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचा कंत्राटदार पळून गेल्याने काम थांबले होते. पण आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली असून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्य तत्पर मंत्री असल्याने या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.