महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर भाजप खासदार रामदार तडस बिनविरोध

Maharashtra State Wrestling| Ramdas Tadas| तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार असून ते स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.
Ramdas Tadas
Ramdas Tadas

मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर नवी दिल्लीत आयोजित एका बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद (Maharashtra State Wrestling) बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार (Sharad Pawar) हे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर आता नव्याने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नव्याने अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भाजप (BJP) खासदार रामदास तडस यांची कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

येत्या रविवारी (३१ जुलै) नागपुरात कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे खासदार तडस यांचा कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रामदास तडस यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार असून ते स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.

Ramdas Tadas
शरद पवारांनाही लांडगे जुमानत नव्हते, म्हणून कुस्तीगीर परिषद बरखास्त ; भोंडवेंचा आरोप

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते, मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच २ जुलै रोजी राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांचं वर्चस्व असलेल्या कुस्तीगीर परिषदेवर ताबा मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं दिसत आहे. नव्या राज्य कुस्तीगीर परिषदेत काकासाहेब पवार सचिव, तर वैभव लांडगे उपाध्यक्षपदी असतील, अशीही चर्चा आहे.

कोण आहेत रामदास तडस?

वर्धा लोकसभा मतदारसंघातून रामदास तडस हे भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये दोन लाखांहून जास्त मतं मिळवत त्यांनी काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांच पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी आपली ते खासदार म्हणून निवडणू आले. भाजपमध्ये येण्यापूर्वी तडस राष्ट्रवादीत होते. वर्धा चंद्रपूर गडचिरोली या विधानपरिषदेतून ते दोनदा आमदार म्हणून निवडून आले. याशिवाय त्यांनी देवळी नगरपरिषदेचं अध्यक्षपद भूषवलं आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना एसटी महामंडळाचं संचालकपदही दिलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेला खासदारच शरद पवारांची जागा घेणार असल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in