भाजप-मनसे संभाव्य युतीची धास्ती; शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसची वाट बघणं थांबवलं!

Congress | Shivsena | NCP : भाजप-मनसे युती झाल्यास मुंबई, ठाणे, औरंगाबादमध्ये शिवसेनेला फटका बसण्याचा अंदाज
भाजप-मनसे संभाव्य युतीची धास्ती; शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसची वाट बघणं थांबवलं!
Uddhav Thackeray, Sharad Pawarsarkarnama

मुंबई : भाजप-मनसे (BJP-MNS) युतीची संभाव्यता लक्षात घेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Shivsena - NCP) आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात चर्चाही झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पुढील काही दिवसातच आघाडीचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (BJP-MNS Alliance update)

मागील अनेक दिवसांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी देखील महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र काँग्रेसने स्वबळाचा नारा देत या चर्चांना खो दिला होता. पण अद्यापही काँग्रेस (Congress) स्वबळावर ठाम असल्याने ही चर्चा आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुढे सरकली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Shivsena-NCP Mahavikas Aaghadi)

Uddhav Thackeray, Sharad Pawar
"मुलाला गणेश नाईकांचे नाव मिळावे" : तक्रारदार महिलेने केली DNA चाचणीची मागणी

आगामी काळात भाजप-मनसे युती झाल्यास मुंबई, ठाणे, औरंगाबाद या शिवसेनेसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या महानगरपालिकांमध्ये फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्थानिक पातळीवर देखील नवे मित्र जुळवण्यासाठी शिवसेनेने पावलं उचलली असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही स्थानिक पातळीवर आघाडी झाल्यास कार्यकर्त्यांची मन जुळतील का? याबाबत चाचपणी करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
सदावर्तेंचा पुढचा मुक्काम विदर्भात; साताऱ्यानंतर अकोला पोलिसांना मिळाली परवानगी

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होण्याचा अंदाज राजकीय वर्तूळात वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेला नवी मुंबई, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालिकांमध्ये फायदा होण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रावादीला मुंबई, ठाणे, औरंगाबाद यासारख्या महापालिकांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.