भाजपचे आमदार गायकवाड भडकले : मी काय मूर्ख आहे का, कामधंदे सोडून तुमच्यासोबत फिरायला
Ganpat GayakwadSarkarnama

भाजपचे आमदार गायकवाड भडकले : मी काय मूर्ख आहे का, कामधंदे सोडून तुमच्यासोबत फिरायला

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी केली.

डोंबिवली - पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्याने लवकरच महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाचे आगमन होणार आहे. अशा स्थितीत भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी केली. हे काम योग्य होत नसल्याने ते अधिकारी व कामगारांवर भडकले. ( BJP MLAs got angry: Am I stupid to leave my job and walk with you? )

पावसाळा तोंडावर आला तरी कल्याण डोंबिवलीत नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाहीत. शुक्रवारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागातील नालेसफाई कामाची पाहणी केली. यावेळी शहरातील अंतर्गत भागात भरून वाहणारी गटारे, नाल्यातील गाळ तसाच नाल्यात पाहून पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आमदार भडकले. मी काय मूर्ख आहे का, माझे काम धंदे सोडून तुमच्यासोबत फिरायला असा संताप जनक सवाल त्यांनी केला. ज्या पक्षाची सत्ता त्याच पक्षाचे कंत्राटदार आणि त्याच पक्षाची लोकं काम करतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना दबून राहावे लागते. मुख्य नाले सफाईच्या कामात भ्रषटाचार झाला असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला.

Ganpat Gayakwad
बाळासाहेब थोरातांचे भाचे झाले राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नालेसफाईची कामे सुरू आहेत. नालेसफाईची कामे 50 ते 55 टक्के पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. शुक्रवारी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान पालिकेचे अधिकारी कर्मचारी देखील उपस्थित होते. दरम्यान तुंबलेली गटारे व नाल्यामधील कचरा पाहून आमदारांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

आठवडाभरापूर्वी पाहणी केली होती तेव्हा सांगितलेली कामे आजतागायत का पूर्ण केली नाहीत? असा सवाल आमदारांनी अधिकाऱ्यांना केला. पुढील दोन ते तीन दिवसात नालेसफाईचे काम पूर्ण झाले पाहिजे अशी तंबी देखील त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली.

Ganpat Gayakwad
अनिल बोंडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य सरकार उठले आहे...

पत्रकारांशी बोलताना आमदार गायकवाड यांनी नालेसफाईच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. नालेसफाई मे महिन्याच्या सुरवातीला सुरू करायला पाहिजे होती मात्र उशिराने सुरू केली. यंदा हवामान खात्याने पाऊस लवकर पडणार सांगितलं असताना देखील अद्याप नालेसफाई पूर्ण झालेली नाही. ज्यांची सत्ता आहे त्यांच्याच पक्षातले कंत्राटदार आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in