राऊतांच्या अटकेनंतर आता शिवसेनेचा 'हा' नेता EDच्या रडारवर ? ; राणेंच्या टि्वटची चर्चा

नितेश राणेंच्या टि्वटची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

पुणे : ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) दोन नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. काल (रविवारी) शिवसेनेचे खासदार संजय (sanjay raut) राऊत यांना ईडीनं अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (nitesh rane latest news)

यापूर्वी महाविकास आघाडीतील काही नेत्यांची ईडीने चौकशी केली, यात दोषी आढळल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. आता ईडीच्या रडारवर कोण आहे, याबाबत चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी सूचक टि्वट केलं आहे.

शिवसेना आमदार अनिल परब (anil parab) यांच्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे. राणेंनी टि्वट करुन परब यांचा फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोवर एक गाणं लावण्यात आलं आहे. "मेहफील सजी है, आजा, देर ना हो जाए..," असं गाणं टाकून राणेंनी परबांना मिश्लिल टोला लगावला आहे. त्यांच्या या मिश्किल टोल्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा रंगली आहे. यापूर्वी भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, अर्जुन खोतकर या नेत्यांचीही ईडीने चौकशी केली आहे.

शिवसेना आमदार अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट खरेदीमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे. परब यांच्यावर ईडी चौकशी करण्यात आली. त्यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. संजय राऊतांना अटक झाल्याने अनिल परबही अडचणीत आहेत. अनिल परबांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही अटक होऊ शकते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी परबांना टोला लगावत टार्गेट केलं आहे.

Nitesh Rane
ठाकरेंना समर्थन देणाऱ्या शहरप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी ; ऑडियो क्लिप व्हायरल

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टवरुन आरोप केला होता. साई रिसॉर्ट हा अनिल परब यांचा असून त्यांनी कोरोना काळात मंत्री पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या त्यांनी केला होता. साई रिसॉर्टचे मालक अनिल परब असून त्यांनी मालमत्ता सदानंद कदम यांना विकली. त्यानंतर सदानंद कदमांचे पत्र उघड करुन सोमय्यांनी पुरावे सुद्धा दिले.

संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि जळगाव येथे निदर्शने केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com