शिवसेनेनंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे दगडी चाळीत

मुंबई महापालिकेची आगामी निवणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे भाजप आणि शिवसेनेतही चढाओढ सुरु झाल्याचे दिसत आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane

मुंबई: मुंबई (Mumbai) महापालिकेची आगामी निवणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे भाजप (BJP) आणि शिवसेनेतही (Shivsena) चढाओढ सुरु झाल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजप- शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मार्च २०२२ अखेरीस होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होणे शक्य नसल्याने आता दोन्ही बाजुने मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.

त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी आता छोट्या स्थानिक पक्षांच्या भेटी-गाठी घेऊ लागले आहेत. महापालिका निवडणूकीत भायखळा, दगडी चाळ, आर्थर रोड, सातरस्ता, चिंचपोकळी येथील मराठी मतदांरा वोट बॅंक आपल्याकडे राहील याची पुरेपूर काळजी शिवसेना आणि भाजपने घेतली आहे.

Nitesh Rane
'सावरकर समलैंगिक होते, असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसलात ; ठाकरेंवर घणाघात

दरम्यान दोन दिवसांपुर्वीच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी भायखळा आणि सातरस्ता येथील अखिल भारतीय सेना नेत्यांची भेट घेत त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) भाजप आमदार नितेश राणे यांनीही दगडी चाळीत दुर्गामातेचे दर्शन घेऊन अरूण गवळी यांचे वारसदार गीता गवळी यांचीही भेट घेतली. त्याचवेळी नितेश राणेंनी अश्विन नाईक यांची आणि त्यांच्या मुलीचीही भेट घेतली.

खरतंर निवडणूकीच्या दृष्टीकोनातून भायखळा, दगडी चाळ, आर्थर रोड, सातरस्ता, चिंचपोकळी हा भाग प्रत्येक पक्षासाठी महत्वाचे मतदार संघ आहेत. तर गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तर २०१७ ची महापालिका निवडणूक आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक लक्षात घेता भाजपला महापौर पदाची संधी असतानाही शिवसेनेचा महापौर बनला होता. त्यामुळे गेल्यावेळी जी चूक झाली ती यावेळी करायची नाही या उद्देशाने मुंबई भाजपने महापालिका निवडणूकांसाठी कंबर कसली आहे.

आगामी निवडणूकीत विजयी होण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह कोअर कमिटीतील आमदार अॅड. आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनिल राणे यांच्या खांद्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी आहे.

तर आमदार नितेश राणे यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार त्यांनी काल दगडी चाळ आणि आर्थर रोड येथील दुर्गा मातेचे दर्शन घेत तेथील स्थानिक पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले, " सहा महिन्यांनी मुंबई महापालिका निवडणूका होणार आहेत. पण भाजप केवळ शिवसेनेप्रमाणे निवडणूका आल्यावरच स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत नाहीत, तर आम्ही कायमच कार्यकर्त्यांच्या आम्ही संपर्कात असतो. दगडी चाळ आणि भायखळा या दोन्ही ठिकाणी तळागाळातील कार्यकर्ते काम करत आहेत. दगडी चाळीतील नगरसेविका गीता गवळी आणि अश्विन नाईक यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. मात्र दोघांनाही भेटल्यावर असे वाटले की, आजही त्यांचा शिवसेनेवर राग आहे. असेही नितेश म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com