आमदार नितेश राणेंनी अटक टाळण्यासाठी उचललं पाऊल

संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Nitesh Rane 

Nitesh Rane 

Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणेंना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नसल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आता थेट उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात मागील आठवड्यात सुनावणी झाली होती. यानंतर सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. राणेंचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना अटक होणार हे स्पष्ट झाले आहे. अटक टाळण्यासाठी राणेंनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर उद्या (ता.4) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane&nbsp;</p></div>
पंतप्रधान मोदी विरुद्ध राज्यपाल वादात आता ओवेसींची उडी

सत्र न्यायालय राणेंच्या जामिनावर निर्णय देण्याआधीच पोलीस दलाने त्यांच्या अटकेची पूर्ण तयारी केली होती. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. मागील आठवड्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane&nbsp;</p></div>
अमित शहांनीच सांगितलं की, मोदी वेडे झालेत! राज्यपालांनी टाकला बॉम्ब

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा मोबाईल दोन दिवसांपासून नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com