पांडे हे त्यांच्या मास्टर्स प्लॅननुसार खेळत आहेत!

प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून भाजप नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे.
Sanjay Pandey News, Praveen Darekar News
Sanjay Pandey News, Praveen Darekar News Sarkarnama

मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल करून त्यांनाही अडकविण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी केला होता. त्यानुसार दरेकर यांच्यावर मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकारवर टीका केली जात आहे. (Sanjay Pandey News)

भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. राणे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 'प्रविण दरेकर हे पुढचे लक्ष्य असतील, हे अपेक्षितच होतं. पांडे हे त्यांच्या मास्टर्स प्लॅननुसार खेळत आहेत. आम्ही हे आधीच भाकित केलं आहे. एकामागून एक ते त्यांच्या 'मास्टर'ची इच्छा पूर्ण करत आहेत. आम्ही प्रवीण दरेकर यांच्यासोबत आहोत. आम्ही सर्व एक आहोत,' असं राणे यांनी म्हटलं आहे.

Sanjay Pandey News, Praveen Darekar News
चीननं पुन्हा जगाला हादरवलं; दैनंदिन रुग्णसंख्येने गाठला उच्चांक

दरम्यान, प्रविण देरकर यांच्यावर मुंबै बँक निवडणुकीतील फसवणुकीप्रकरणी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रविण दरेकर यांना या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती.

'या नोटिशमध्ये 'आपण मजूर आहात की नाही,' अशी विचारणा करण्यात आली होती. याशिवाय यापूर्वीच प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सांगत त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. असे म्हणतं मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,'' असे आदेश उच्च न्यायालयाकडूनही देण्यात आले होते.

दरेकर यांनी मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते. तसेच त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विधान परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र ठरवताना याच बाबींकडे लक्ष वेधत तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असे आपल्या आदेशात स्पष्ट केले होते. त्यानंतर आता दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com