जगताप भेटताच भाजपने मनीषा चौधरींना हितेंद्र ठाकूरांकडे पाठवले
Hitendra Thakur,Manisha Chaudharysarkarnama

जगताप भेटताच भाजपने मनीषा चौधरींना हितेंद्र ठाकूरांकडे पाठवले

विधान परिषदेवरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे

विरार : राज्यसभेच्या निवडणुकीपासून विरार राजकारणाचा केंद्र बिंदू झाले आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी हि राजकीय नेत्यांच्या फेऱ्या विरार मधील आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्या कार्यालयात वाढू लागल्या आहेत. बुधवारी काँग्रेसचे (Congress) भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ठाकुरांची भेट घेतल्या नंतर आज भाजपच्या (BJP) आमदार मनीषा चौधरी ह्या हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना ऊत आला आहे. (Legislative Council Latest Marathi News)

भाजपच्या आमदार मनीषा चौधरी ह्यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर वसईच्या वर्तक महाविद्यालयात शिक्षण घेतले असून त्यानंतर त्या डहाणूच्या नगराध्यक्षा झाल्या होत्या. त्यामुळे आजही ठाकूर आणि चौधरी यांचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. आज हितेंद्र ठाकूर आणि मनीषा चोधरी यांच्यात बंद दाराआड जवळपास अर्धातास बैठक झाली.

Hitendra Thakur,Manisha Chaudhary
लाड अन् भाईंचा संघर्ष; दोघेही एकमेकांना नाकीनऊ आणणार

बैठकीनंतर मात्र, मनीषा चौधरी यांनी विधानपरिषद निवडणुकीवर न बोलता इतर नेत्या प्रमाणेच आपले उत्तर देऊन, माझे ठाकूर परिवाराचे जवळचे संबंध आहेत. मी विधानपरिषदेसाठी नाही तर पालघर जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण विषयावर चर्चा केल्याचे सांगितले आहे. तर विधान परिषदेची चर्चा करण्याएवढी मोठी मी कार्यकर्ती नाही, असेही त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मते मिळवण्यासाठी भाई जगताप यांनी मंगळवारी ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकले नाही. परंतु ठाकूर आणि जगताप यांनी आमचे मैत्रीचे जुने संबंध असल्याचे सांगितले.

Hitendra Thakur,Manisha Chaudhary
महाविकास आघाडीचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार? शेलारांसह दरेकर, महाजनांवर मोठी जबाबदारी

हितेंद्र ठाकूरांसह, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील अशी तीन मते काँग्रेसच्या उमेदवारांना मिळावी, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी 10 मते कमी पडतात. त्यासाठी जगताप यांनी मंगळवारी विरार गाठले. राज्य सभेच्यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणुकीत पडल्याने यावेळी आता पासूनच महाविकास आघाडीने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in