भंगाराचा व्यवसाय करता करता मलिकांनी आपली मतीही भंगरात विकली!

सरकार वसूलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागते.
भंगाराचा व्यवसाय करता करता मलिकांनी आपली मतीही भंगरात विकली!
Gopichand Padalkar,Nawab Maliksarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक (Nawab Malik) यांना पत्रकार परिषदेत मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात चैाकशी समिती नेमावी, अशी मागणी केली होती. तसेच एनसीबीची कारवाई 'फर्जीवाडा' आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावर नवाब मलिक यांना बिनबुडाचे आरोप करण्याची सवय झाली आहे. भंगाराचा व्यवसाय करता करता त्यांनी आपली मतीही भंगरात विकली आहे, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. (BJP MLA Gopichand Padalkar criticizes Nawab Malik)

Gopichand Padalkar,Nawab Malik
भाजपला धक्का : अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील कारवाई भोवणार

या संदर्भात पडळकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये पडळकर म्हणले, त्या क्रुजवर तेराशे लोकं प्रवास करत होते. त्यात तुमचेही काही जवळचे होते. तपासानंतर ज्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला. त्यांनाच फक्त एनसीबीने अटक केली. उर्वरीत लोकाना एनसीबीने सोडलेले आहे. मुळात तुमचे वसूली सरकार हे वसूलीत गुंग असल्यामुळे एनसीबी असो की दिल्लीतली एटीएस यांनाच कारवाई करावी लागते, असा आरोप पडळकर यांनी केला.

तुमच्या स्वताच्या जावायाला ड्रग्स केसमध्ये अटक झाली. असताना तेंव्हा तुम्ही कशासाठी गप्प बसले होता? नवाब मलिकांना मुळात आर्यन शाहरूख खानची चिंता आहे की त्यांना ड्रग्ज विक्री करणाऱ्या टोळक्यांची चिंता आहे? असे तर नाही ना की एनसीबीने सखोल तपास केल्यास तुमचे ड्रग्स टोळक्यांशी असणारे लागेबांधे ऊघडे पडणार आहेत? या भितीपोटी तर तुम्हाला झोप लागत नाहीये ना, असा सवाल पडळकर यांनी केला आहे.

Gopichand Padalkar,Nawab Malik
राणे, ठाकरे शेजारी बसले पण एकमेकांकडे बघितलं नाही अन् बोललेही नाहीत!

नवाब मलिक काय म्हणाले होते.

मलिक म्हणाले की रिषभ सचदेवा हे मोहित भारतीय यांचे भाचे आहेत. या तिघांना सोडण्यासाठी एनसीबीला कोणी फोन केला, याचा खुलासा झाला पाहिजे. समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांनी तपासावे. एनसीबीची कारवाई 'फर्जीवाडा' आहे, ''हि मोठ्या घरातील मुले आहेत. त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. ते एकमेंकांचे मित्र आहे. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यात आले. ज्यांनी आर्यन खानला बोलावले त्यांना का सोडण्यात आले, असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला. माझे काम सत्य समोर आणणे हे आहे. फरार आरोपी के.पी. गोसावी हा या प्रकरणात पंच कसा झाला, असा प्रश्न मलिक यांनी विचारला. ''या प्रकरणात तेराशे जणांची चैाकशी केली. यातील ११ जणांची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली, त्यातील तीन जणांना सोडण्यात आले. त्यांना सोडण्यासाठी भाजपच्या कोणत्या नेत्याने एनसीबीला फोन केला याचा खुलासा करावा,'' अशी मागणी मलिकांनी केली होती.

Related Stories

No stories found.