भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल ; २७ वर्ष 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा

राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल ; २७ वर्ष 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा
Ganesh Naiksarkarnama

नवी मुंबई : भाजप (BJP)आमदार गणेश नाईक (Ganesh Naik)यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बेलापूरनंतर आता नेरुळ पोलीस ठाण्यात देखील नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. २७ वर्ष गणेश नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं ही तक्रार दिली आहे.

यापूर्वी नाईक यांच्याविरोधात या महिलेनं बेलापूर (CBD Belapur Police Station)पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

राज्य महिला आयोगानेही (Maharashtra State Commission for Woman)या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इन मध्ये राहण्याचा दावा या महिलेने केला आहे.

Ganesh Naik
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली!

पीडित महिलने राज्य महिला आयोगाकडे केल्या अर्जामध्ये भारतीय दंड विधान 376, 420, 504, 505 अन्वये गुन्हा नोंद करुन पोलिसांकरवी संरक्षण उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती केली आहे. महिलेने केलेल्या आरोपानुसार, सदर महिला व गणेश नाईक हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. या संबंधातून त्यांना एक 15 वर्षांचा मुलगाही आहे.

Ganesh Naik
राज ठाकरेंना शह देण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात ; राऊतांकडून मोठी घोषणा

गणेश नाईक यांनी आपल्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, १९९३ पासून लग्नाचे आमिष दाखवत ते सातत्याने आपले लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप या महिलेने तक्रारीत केला आहे.

पीडित महिला जेव्हा गणेश नाईक यांच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा करत असे तेव्हा ते तिला जीवे मारण्याची धमकी देत. पीडितेने नाईक यांच्याकडे वैवाहीक अधिकार मागीतले या वेळी त्यांनी तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.

गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनीही संबंधित महिलेने गणेश नाईक यांच्यासोबत असलेले संबंध संपवून इतर ठिकाणी निघून जावे यासाठी सातत्याने त्रास आणि धमक्या देत असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

नाईक कुटुंबीयांच्या त्रासाबद्दल नेरुळ पोलीस स्थानकात वारंवार तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी पीडितेने राज्य महिला आयोगाकडे केली होती.

या प्रकरणाची चैाकशी करण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या आहे, तर गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.