परमबीरसिंह अन् शिवसेनेचे साटेलोटे : अतुल भातखळकर

परमबीरसिंह व शिवसेनेचे (ShivSena) साटेलोटे असल्याचा माझा आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला.
परमबीरसिंह अन् शिवसेनेचे साटेलोटे : अतुल भातखळकर
Atul BhatkhalkarSarkarnama

मुंबई : मुंबईची माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी राज्याचे पोलिस अधिकारीच मदत करत नसल्याचे स्वतः सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगून टाकले. त्यामुळे पहिल्या दिवसापासून परमबीरसिंह व शिवसेनेचे (ShivSena) साटेलोटे असल्याचा माझा आरोप सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून सिध्द झाला, असल्याचे वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

Atul Bhatkhalkar
अन्यथा परमबीरसिंहांवर कारवाई करावी लागेल! चांदीवाल समितीची तंबी

परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर तब्बल 261 दिवस फरार होते. तरी सुद्धा त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे का केली नाही, असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. त्यांना होमगार्ड महासंचालक या पदावरून हटवण्याची कारवाई राज्य सरकारने का केली नाही? परमबीरसिंह यांच्यावर एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना शोधण्यासाठी विशेष पथक का स्थापन केले नाही? या बाबतीत केंद्र सरकार किंवा इतर राज्यांची मदत का मागितली नाही? याचे कारण म्हणजे ''त्या अनिल वर आरोप केले तर केले, पण आमच्या अनिल वर कोणतेही आरोप करू नको, मी तुझ्यावर कारवाई करत नाही. अशा 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' संवादातून शिवसेनेने हे सर्व नाटक चालविले आहे, असा गंभीर आरोप भातखळकर यांनी केला.

Atul Bhatkhalkar
परमबीर सिंहांना शिक्षा होणारच ; सरकार न्यायालयीन लढाई लढणार

परमबीरसिंह यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची गंभीरता लक्षात घेता त्याची निःपक्ष चौकशी व्हावी. याकरिता तपास सीबीआय कडे द्यावा, अशी मागणी भातखळकर यांनी केली. तसेच, आपल्या पापाची फळे कायमच भाजप व केंद्र सरकारच्या माथी मारणाऱ्या कॉंग्रेसवाल्यांनी परमबीरसिंह यांना केंद्र सरकारने परदेशी पळून जाण्यात व फरार करण्यात मदत केली. असा खोटा आरोप केला होता, परंतु परमबीरसिंह हे इतके दिवस भारतातच होते व काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्याच्या राजधानीत चंदिगडमध्ये होते. हे आता सिद्ध झाले आहे. एकीकडे आपण ज्या पक्षासोबत सत्तेत भागीदार आहोत तोच पक्ष परमबीरसिंह यांना वाचवित होता. हे माहीत असताना सुध्दा त्याबद्दल चकार शब्द काढायचे नाही. दुसरीकडे मात्र मोदी द्वेषातून केंद्र सरकारवर नाहक व खोटे आरोप करायचे हा काँग्रेसचा ढोंगीपणा आता उघड झाला, असल्याची टीका भातखळकर यांनी केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in