'सत्ता गेल्यावर आदित्य ठाकरे युवासेना बंद करून शिशुसेना काढण्याच्या तयारीत'

Aditya Thackeray|Shivsena|Atul Bhatkhalkar : भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Aditya Thackeray & Atul Bhatkhalkar Latest News
Aditya Thackeray & Atul Bhatkhalkar Latest NewsSarkarnama

Aditya Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) सुमारे 40 आमदार घेत भाजपच्या (BJP) समर्थनाने सत्ता स्थापन केली आणि मुख्यमत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर सत्ता स्थापन केल्यानंतर लगेच त्याच दिवशी मुंबई मेट्रोचे कारशेड 'आरे'मध्येच करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. यावरून पुन्हा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाले.

दुसरीकडे आरे वाचवा असे आंदोलन सुरू झाले. या आंदोलकांना माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भेट दिली. दरम्यान या आंदोलनात लहान मुलांचा वापर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे आदित्य यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. यावरूव भाजप नेत्यांकडून आदित्य यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे आता युवासेना बंद करून शिशुसेना काढण्याच्या तयारीत असल्याची बोचरी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आदित्य यांच्यावर केली आहे. (Aditya Thackeray & Atul Bhatkhalkar Latest News)

Aditya Thackeray & Atul Bhatkhalkar Latest News
मुख्यमंत्री म्हणाले, ठाण्याचं काम फास्ट असतं; फडणवीसांनी केले कौतुक...

भातखळकरांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करून शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत" अशा शब्दात भातखळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचले आहे.

आरेमधील कारशेड उभारण्याच्या निर्णयाविरोधात 'आरे वाचवा' हे आंदोलन करण्यात आले. आरेतील पिकनिक पॉइंट येथे पर्यावरणप्रेमी,पर्यावरण संस्था आणि राजकीय पक्षांनी निदर्शने केली. यावेळी आदित्य यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. मात्र, या आंदोलनात लहान मुलांचा वापर झाल्याची तक्रार 'सह्याद्री राइट फोरम'चे विधी विभाग प्रमुख दृष्टीमान जोशी यांनी ट्विटरवरून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडे केली होती. याची दखल घेत आदित्य यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून भातखळकरांनी आदित्य यांना टोला लगावला आहे.

Aditya Thackeray & Atul Bhatkhalkar Latest News
राष्ट्रवादीची बैठकीला दांडी मारुन जितेंद्र आव्हाड थेट एकनाथ शिंदेच्या भेटीला

दरम्यान, राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून आदित्य आणि इतर संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. याप्रकरणाची चौकशी करूत गुन्हे दाखल करा. सबंधित मुलांना बाल कल्याण समितीसमोर हजर करून त्यांचेही जबाब नोंदवा. या सर्व कार्यवाहीचा अहवाल एफआयआरच्या प्रतीसह पुढील तीन दिवसांत सादर करावा, असेही आदेशही आयोगाने दिले. यानंतर आता आदित्य यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आता या प्रकरणी पुढे काय होते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com