पटोलेंच्या कॉंग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला : शेलारांनी लावली वात..

आदित्यजी, तुम्ही कितीही मलमपट्टी केली तरी मुंबईकरांच्या विकासाची शस्त्रक्रिया करायला हवी,"
Ashish Shelar
Ashish Shelar sarkarnama

मुंबई : भाजपचे नेते आशीष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. शेलार (Ashish Shelar) यांनी आघाडीतील नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आघाडी सरकारच्या परिस्थितीवर भाष्य केलं. (Ashish Shelar latest news)

शेलार म्हणाले, "राज्यसभा निवडणुकीच्या वेळी नाना पटोलेंच्या कॉंग्रेसनं शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना आमच्या सोबत होती, तेव्हा त्यांना अशी वागणूक कधीच मिळाली नाही. राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत पडता पडता वाचले. त्याचे नेहमीच 'लावली जीभ उचलली टाळ्याला'सुरू आहे," "संजय राऊत यांनी शिवसेनेची गोची केली आहे," अशी टीकाही शेलारांनी यावेळी केली.

Ashish Shelar
Presidential Election : शरद पवार जिंकले असते ; निवडणूक रंगतदार झाली असती !

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नालेसफाई कामाच्या पाहणीवर शेलारांनी तोफ डागली. ते म्हणाले,"नालेसफाईचा दिरंगाईपणा एका व्हिजिटने पुसू शकत नाही. नालेसफाईच्या कामावेळी हे कुठे होते? आदित्यजी, तुम्ही कितीही मलमपट्टी केली तरी मुंबईकरांच्या विकासाची शस्त्रक्रिया करायला हवी,"

मुंबईतील महापालिका शाळांच्या गैरसोयीबाबत शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुलांनी ज्या प्राथमिक २७ बाबी पाहिजे आहेत, ते त्यांना प्रशासन पुरवू शकत नाही, याबाबत शेलारांनी खंत व्यक्त केली.

"विधानपरिषद निवडणुकीत आघाडी सरकारमध्ये सध्या रस्सीखेच, पळवापळवीचा खेळ सुरु आहे. मात्र, एकमेंकासमोर आल्यावर त्यांचे साळसूद चेहरे असतात, हे चित्र "अशी ही बनवाबनवी" चित्रपटासारखे आहे, " अशी टीका शेलार यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com