मुंबई महापालिकेने खर्च केलेले दोन लाख कोटी गेले कुठे?

Ashish Shelar|Uddhav Thckeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एक मंत्री असा आहे की, जो म्हणतोय 'नवाब मलिक का सपना, दाऊद का माल अपना, असे भाजप आमदार ॲड. आशीष शेलार यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने खर्च केलेले दोन लाख कोटी गेले कुठे?
Ashish ShelarSarkarnama

मुंबई : दरवर्षी सरासरी ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प (Budget) सादर करणाऱ्या मुंबई महापालिकेने (BMC) गेल्या पाच वर्षांत दोन लाख कोटी रुपये खर्च केले ते कुठे गेले?, असा सवाल करत सत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केला आहे, अशा शब्दात भाजप (BJP) नेते आमदार ॲड. आशीष शेलार (Ashish Selar) यांनी भाजपच्या पोलखोल सभेमध्ये सोमवारी (ता.19 एप्रिल) विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

Ashish Shelar
गणेश नाईकांवर दुहेरी संकट : अटकेची टांगती तलवार आणि संपत्तीतील वाटाही देण्याची मागणी

मुंबई भाजपतर्फे मुंबईत पोलखोल सभांचे आयोजन करण्यात आले असून या शृंखलेतील दुसरी सभा दहिसर येथील गणपत पाटीलनगरमध्ये झाली. आमदार मनीषा चौधरी, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या सभेत बोलताना शेलार यांनी महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करीत शिवसेना आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Ashish Shelar
उद्धव ठाकरेंच्या मागे साडेसाती लागली, मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणणार…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये एक मंत्री असा आहे की, जो म्हणतोय 'नवाब मलिक का सपना, दाऊद का माल अपना,' दुसरा मंत्री अस्लम शेख ज्यांनी याकुब मेमनच्या फाशीला विरोध केला होता, अशा मंत्र्यांना सरकारच जर संरक्षण देणार असेल, तर अशा वेळी मुंबईकरांचे संरक्षण कोण करणार? या मुंबईतील एक कोटी ४० लाख मुंबईकरांसाठी महापालिका पाच वर्षांत दोन लाख कोटी खर्च झाले. मग जागतिक कीर्तीचे डॉ. अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू कसा होतो? घाटकोपरची एक महिला चक्कीवर दळण टाकण्यासाठी निघते तिचा मृत्यू गटारात पडून कसा होतो? वरळीच्या सिलिंडर स्फोटातील कुटुंबाला पालिका रुग्णालयात चार तास उपचार का मिळाले नाहीत? पालिका रुग्णालयात औषधे का मिळत नाहीत?, असे प्रश्नही शेलारांनी यावेळी उपस्थित केले आणि विरोधकांना सुनावले

सवाल विचारण्यासाठी सभा...

गणपत पाटील नगरमधील गरीब माणसांना घर देण्याचा विषय आला की, हा एनडी झोन आहे, असे सांगितले जाते. तर अंधेरीतील मधू वखारिया यांची मोकळी जागा, जिथे तिवर आहेत ती जागा आरक्षण बदलून मात्र अविनाश भोसले, विकी ओबेरॉय बिल्डरांना दिली जाते. मेट्रो कारशेडचे काम झाडे तुटणार सांगत अडविले जाते. दुसरीकडे बिल्डरांना ३८ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते, असे पालिका आणि आघाडी सरकारच्या वागण्यातील विरोधाभास मांडत याबाबत सवाल विचारण्यासाठी ही पोलखोल सभा आहे, असेही शेलार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.