'विश्वास नांगरे पाटील हे चमकेश अधिकारी!'

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत.
Vishwas Nangre Patil
Vishwas Nangre Patilsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. शरद पवार यांच्या घराबाहेर जी घटना घडली ती निंदनीय आहे. मात्र, पवार यांच्या सुरक्षेबाबत ही अवस्था असेल तर मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल भाजपचे (Bjp) आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी केला आहे.

या संदर्भात अमित साटम म्हणाले, मी आधीच सांगितले होते. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे तडजोड करणारे पोलीस आयुक्त आहेत. संजय पांडे बिल्डरांना धमकावने, सोसायट्यांच्या मॅनेजिंग कमिट्यांना आणि डॉक्टराना धमकावणे तसेच भाजप नेत्यांना गोवणे यात त्यांना रस आहे, असा आरोप साटम यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Vishwas Nangre Patil
Silver Oak Attack : मराठा क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आक्रमक : वळसे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

तर मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nagre Patil) यांच्यावरही साटम यांनी निशाणा साधला आहे. विश्वास नांगरे पाटील हे चमकेश अधिकारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांगरे पाटील यांनी भाजप नेत्यांवर पाळत ठेवण्यात रस असल्याने, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली आहे. तडजोड करणाऱ्या पोलीस आयुक्तांपासून मुंबईकरांची लवकरात लवकर सुटका करा, अशी मागणी साटम यांची मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केली आहे.

Vishwas Nangre Patil
पोलिसांनी वडापाव स्ट्रॅटेजी वापरली अन् कर्मचारी अलगद जाळ्यात आले

दरम्यान, पवार यांच्या घरासमोर घडलेल्या घटनेमुळे सर्वच नेत्यांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. पवारांच्या घरावरील हा हल्ला म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे अपयश असल्याच्या चर्चा सुरु आहेत. सर्वपक्षीय नेत्यांकडून पोलीस काय करत होते? पोलिस कमी पडले, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पोलीस कमी पडल्याची कबुली देत आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, हल्ल्यामागचा सूत्रधार पोलीस शोधत आहेत. या प्रकरणात पोलीस कुठेतरी कमी पडले. पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ माहिती घेत आहेत. कारण माध्यमांना माहिती मिळते, पण पोलिसांना का मिळत नाही? हा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com