भाजप तोंडघशी; रस्त्याला टिपू सुलतानचे नाव देण्याची भाजप आमदाराचीच होती मागणी

मालाड मधील मालवणी भागातील क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान या नावावरून जोरदार राजकारण सुरू झालं आहे.
BJP, Tipu Sultan
BJP, Tipu SultanSarkarnama

मुंबई : मालाड मधील मालवणी भागातील क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान (Tipu Sultan) या नावावरून जोरदार राजकारण (Politics) सुरू झालं आहे. भाजपसह (BJP) हिंदुत्ववादी संघटनांनी यांनी नामकरणाला तीव्र विरोध केला आहे. पण आता या प्रकरणात भाजपचं तोंडघशी पडल्याचे दिसत आहे. भाजपचे सध्याचे आमदार व तत्कालीन नगरसेवकांनी टिपू सुलतानचे रस्त्याला नाव देण्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. महापालिकेतील याबाबतचे दोन ठराव समोर आले आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीच याबाबतची माहिती समोर आणली आहे. भाजपाचे सध्याचे आमदार आणि तत्कालीन नगरसेवक अमित साटम (Ameet Satam) यांनी 2013 मध्ये एम पूर्व वॉर्ड इथल्या बाजीप्रभू देशपांडे चौका पासून सुरु होणाऱ्या रफिक नगर नाल्यापर्यंतच्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक चारला 'टिपू सुलतान मार्ग' असं नाव देण्याचा ठराव करण्यात आला होता. या ठरावाला साटम यांनी अनुमोदन दिलं होतं. या ठरावाला भाजपच्या इतर सदस्यांनीही विरोध न केल्याने बिनविरोध मान्य झाला होता.

BJP, Tipu Sultan
'राष्ट्रपतींकडूनही टिपू सुलतानचं कौतुक; भाजप त्यांचाही राजीनामा मागणार का?'

त्याचप्रमाणे भवन्स महाविद्यालयपासून गिलबर्ट हिलमार्गे सी. डी. बर्फीवाला मागार्च्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या मार्गालाही शेर ए टिपू सुलतान असं नाव देण्याची मागणी तत्कालीन नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी केली होती. ते सूचक असलेल्या ठरावाला मोहसीन हैदर यांनी अनुमोदन दिलं होतं. हा ठराव 23 एप्रिल 2001 रोजी करण्यात आला होता. या दोन्ही रस्त्यांच्या नावाचे ठराव आता समोर आल्याने भाजपची कोंडी झाली आहे.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरूवारी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली. ते म्हणाले, फक्त त्यांनाच इतिहासाचं ज्ञान असल्याचे भाजपला वाटते. त्यांच्यातील प्रत्येक जण नव्याने इतिहास लिहिण्यासाठी बसले आहे. हे इतिहासकार इतिहास बदलण्यासाठी इथे आहेत. आम्हाला टिपू सुलतानविषयी माहिती आहे, भाजपने शिकवू नये. हे त्यांना शोभत नाही. सरकार निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे.

BJP, Tipu Sultan
सोमय्यांनी आधी हसत पोझ दिली अन् आता फोटोग्राफरलाच आणलं गोत्यात!

तुम्ही नव्याने इतिहास लिहू नका. तुम्हाला त्यात यश मिळणार नाही. टिपू सुलतान हा ऐतिहासिक योध्दा होता, स्वातंत्र्यसैनिक होता, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकमध्ये जाऊन कौतुक केलं आहे. आता तुम्ही राष्ट्रपतींनाही राजीनामा मागणार का? भाजपने यावर स्पष्टीकरण द्यायला हवं. ही केवळ नौटंकी आहे, असा हल्लाबोल करत राऊतांनी भाजपला सवाल केला.

दरम्यान, मैदानाबाहेर भाजपने बुधवारी जोरदार आंदोलन केले. गेल्या ७० वर्षांत टिपू सुलतानच्या नावावरून कोणताही संघर्ष झाला नाही, आज भाजपने देशाची बदनामी करण्यासाठी आपले गुंड पाठवले आहेत आणि प्रकल्पांच्या नावावरून गदारोळ करून देशाचा विकास होऊ दिला नाही. आम्हाला नामांकनावरून वादात पडण्याची गरज नाही, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com