Rahul Gandhi Visits Matoshree : Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray : Atul Save
Rahul Gandhi Visits Matoshree : Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray : Atul SaveSarkarnama

Rahul Gandhi Visits Matoshree : राहुल गांधींचे 'मातोश्री' भेटीच्या चर्चेवरून भाजप मंत्र्यांची टीका; म्हणाले, "त्यांच्या गाठीभेटी..."

Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray : "त्यांनी कितीही भेटीगाठी घेतल्या तरी..."

Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray : राहुल गांधींच्या निशाण्यावर नेहमी राहुल गांधी असतात. मात्र काही दिवसांपूर्वी जाहीर सभेतून शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना इशारा दिला होता. सावरकरांचा अवमान यापुढे सहन करणार नाही, असा दमच ठाकरेंनी भरला होता.

यानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काही मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आता यांनतर राहुल गांधी मातोश्रीवर (Matoshree Niwas) ठाकरेंच्या भेटीसाठी येणार असल्याचे समजते आहे. यावरूनच आता भाजपने (BJP News) शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल सुरू केले आहे.

Rahul Gandhi Visits Matoshree : Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray : Atul Save
Aam Adami Party: विधवा महिलांना गंगा भागीरथी म्हणण्यास विरोधी पक्षांचा नकार; काय आहे कारण?

भाजपचे नेते व आमदार अतुल सावे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात माध्यम प्रतिनिधींशी बोलतान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळे त्यांनी राहुल गांधीच्या संभाव्य भेटीवरून ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

Rahul Gandhi Visits Matoshree : Rahul Gandhi Meet Uddhav Thackeray : Atul Save
Electricity Subcidy Stop In Delhi : दिल्लीतील मोफत वीज आजपासून बंद; राज्यपालांवर फोडले खापर!

नेमकं काय बोलले अतुल सावे?

"महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांकडून रोज वेगवेगळी विधाने येत आहेत. सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेगळे विधान करतात. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे वेगवेगळे दावे करतात. यामुळे महाविकास आघाडीतभूमिका घेण्यावरून एकमत नसल्याचे दिसून येते, असे अतुल सावे म्हणाले.

"केवळ भेटीगाठी घेऊन समन्वय साधला जात नाही. तर हा समन्वय विचारांमध्ये असावा लागतो. ते कितीही वेळा एकमेकांची भेट राहिले, त त्याचा काही उपयोग होणार नाही," अशी टीका मंत्री अतुल सावे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com