भाजप सत्तास्थापनेसाठी मैदानात; आमदारांच्या आकड्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी

BJP | Vinod Agarwal | भाजप अधिकृतपणे सत्ता स्थापनेच्या खेळात उतरली...
भाजप सत्तास्थापनेसाठी मैदानात; आमदारांच्या आकड्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी
Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला आवश्यक असलेला ३७ आमदारांचा कोटा पूर्ण झाला आहे. या गटाने आज एकनाथ शिंदे यांची नेतेपदी निवड देखील केली. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदेंचा गट महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा गट भाजपला पाठिंबा देण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Shivsena | Eknath Shinde Latest News)

एका बाजूला या घडामोडी घडत असताना भाजप (BJP) देखील सत्ता स्थापनेच्या दृष्टीने मैदानात उतरली आहे. भाजपने त्यांच्या समर्थक आमदारांची जुळवाजुळव सुरु केली असून गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश. तसेच पक्षाला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची विधीमंडळात सहयोगी सदस्य म्हणून नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis, Parinay Phuke
Devendra Fadnavis, Parinay Phukesarkarnama

भाजपला अपक्ष आमदार रवि राणा, महेश बादली, गीता जैन, राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे आणि विनोद अग्रवाल या पाच अपक्षांचा आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे अशा एकूण ८ आमदारांचा पाठिंबा आहे. या सर्वांची आता भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिवसेनेने या सर्व आमदारांना परत आणण्यासाठी चर्चांचे मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. आज सकाळपासून शिवसेनेने एक पाऊल मागे येत या आमदारांना चर्चा करण्याचे आणि चर्चेतून निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे म्हणतं आमदारांना परत येण्याचे आवाहन केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in