पंकजा मुंडे, राम शिंदे यांना ज्या नियमाने पद नाकारले.. त्यासाठी अनिल बोंडे अपवाद ठरले!

विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे आणि राम शिंदे यांच्या नावाचा विचार होण्याची चिन्हे
पंकजा मुंडे, राम शिंदे यांना ज्या नियमाने पद नाकारले.. त्यासाठी अनिल बोंडे अपवाद ठरले!
Anil Bonde-Pankaja Mundesarkarnama

मुंबई : राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांचे नशीब जोरदार ठरले. अपेक्षित नसतानाही त्यांना राज्यसभेसाठी संधी भाजपने दिली. खरे तर बोंडे यांच्यापेक्षाही पंकजा मुंडे (Pankaja Munde), राम शिंदे (Ram Shinde) या नेत्यांचे समर्थक राज्यसभेच्या उमेदवारीकडे डोळे लावून बसले होते. पण त्यांना संधी मिळाली नाही. आता विधान परिषदेच्या रिक्त जागांवर तरी त्यांचा विचार होणार का, याची उत्सुकता आहे.

पंकजा आणि राम शिंदे हे 2019 पासून कोणत्याही पदावर नाहीत. बोंडे यांच्यासह या तिन्ही तत्कालीन मंत्र्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. पराभव झालेल्या मंत्र्यांना पुन्हा मागच्या दराने पदे द्यायची नाहीत, असा भाजपने नियम बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत पराभूत उमेदवारांना कुठेच संधी मिळाली नाही. तत्कालीन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019 मध्ये उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर गेल्या काही दिवसांपूर्वी घेण्यात आले.

Anil Bonde-Pankaja Munde
महाविकास आघाडीच्या आमदारांची मते फुटणार नाहीतच... प्रफुल्ल पटेलांनी सांगितले कारण

पराभूत मंत्र्यांना पद द्यायचे नाही, या नियमाला राज्यात बोंडे पहिल्यांदा अपवाद ठरले आहेत. भोंडे यांचा 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत मोर्शी मतदारसंघातून देवेंद्र भुयार यांनी पराभव केला होता. पंकजा यांचा परळीतून तर राम शिंदे यांचा कर्जत-जामखेडमध्ये पराभव झाला होता.

या नियमाला सगळ्यात आधी गोपीचंद पडळकर हे पण अपवाद ठरले होते. मात्र त्यांचा पराभव अजित पवार यांच्यासारख्या बलाढ्या नेत्याकडून झाला होता. त्यांचा पराभव होणार हे त्यांनी अर्ज भरला तेव्हाच माहीत होते. पण ते मंत्री नव्हते. त्याच वेळी त्यांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना भाजपने राज्यसभेसाठी पुन्हा एकदा संधी दिली असून डॉ. विनय सहस्रबुध्दे यांच्या ऐवजी अमरावती जिल्ह्यातील डॉ.अनिल बोंडे यांना दुसरा उमेदवार घोषित केले आहे. तिसऱ्या उमेदवारासाठी २२ अतिरिक्त मते असल्याने पक्षाने धनंजय महाडिक यांना तिसरा उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

Anil Bonde-Pankaja Munde
Rajya Sabha Election : प्रतापगढींची मराठीतून शपथ! यावरच काॅंग्रेस नेते खूष!!

पीयूष गोयल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.आत्मनिर्भर भारत मोहिमेत त्यांची महत्वाची भूमिका आहे. मुंबई मुख्यालय असलेल्या गोयल यांना पुन्हा संधी दिली जाईल असा होरा होता. पीयूष यांचे दिवंगत वडिल वेदप्रकाश आणि दिवंगत आई चंद्रकांता हे दोघेही जनसंघ आणि भाजपचे मोठे नेते होते.


डॉ. बोंडे हे तुलनेने भाजपतील नवे नेतृत्व आहे .मात्र अमरावती अकोला या भागातील कुणबी समुदायाकडे लक्ष ठेवून त्यांना राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. उच्चशिक्षित बोंडे डॉक्टर आहेत तसेच जलसंधारणाच्या कामात रस घेतात. गेले काही दिवस ते अत्यंत आक्रमक भाषेत महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात.डॉ.विनय सहस्रबुध्दे यांना मात्र या वेळी पुन्हा संधी दिली गेली नाही.ते भारत आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे कॅबिनेट दर्जाचे पद आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in