नाईकांवर अटकेची टांगती तलवार अन् चंद्रकांतदादा म्हणाले, न्यायालयात न्याय मिळेल!

भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर नवी मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

नवी मुंबई : भाजपचे (BJP) आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर नवी मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून गणेश नाईक यांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईवरून भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नाईक यांना न्यायालयातून न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

नाईक यांचे कोपरखैरणेमधलं घर, कार्यालय आणि मुरबाडमधल्या फार्महाऊसवर पोलिसांचं पथक त्यांचा शोध घेणार असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबत माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले, महिलेने केलेल्या आरोपांची शहानिशा होईल. याआधाही भाजपवर असे अनेक आरोप झाले आहेत. नाईक यांना न्यायालयातून न्याय मिळेल, असे पाटील यांनी नमूद केलं.

Chandrakant Patil
दिल्लीत बसलेली व्यक्ती तुम्हाला धोका देईल! कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्र्यांना केलं सतर्क

दरम्यान, गणेश नाईकांवर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले आहेत. जिवे मारण्याची धमकी दिल्याने पिडीत महिलेने नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गणेश नाईक यांना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Chandrakant Patil
संजय राऊत 'त्या' विधानावर ठाम; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

काय आहे प्रकरण?

नाईक यांच्याबरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा आरोप एक महिलेने केला होता. लिव्ह इन रिलेशनमधून मी एका मुलाला जन्म दिला. मात्र, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला असून आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा, आरोप या महिलेने केला होता. मार्च 2021 मध्ये सीबीडी येथील नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती. असा आरोप करत महिलेने सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

Chandrakant Patil
राऊत, खडसे समाज विघातक; असा झाला फोन टॅपिंगचा प्लॅन

पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नसल्याने संबंधित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना कारवाई कण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिल्या होत्या. या बरोबरच गणेश नाईक यांनी स्वत: पुढे येऊन डीएनए चाचणी करावी, आणि याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com