समीर वानखेडेंचा कार्यकाळ वाढवण्यासाठी भाजप नेत्यांकडून दिल्लीत लॉबिंग!

नवाब मलिक यांनी आज सकाळीच पत्रकार परिषदेत एनसीबी अधिकारी, समीर वानखेडे आणि भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
Nawab Malik 

Nawab Malik 

मुबंई : मुंबई ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान प्रकरणानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे. आज (2 जानेवारी) सकाळी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर आणि भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडेंवरही (Sameer Wankhede) निशाणा साधला आहे.

31 डिसेंबर 2021 रोजी समीर वानखेडे यांचा एनसीबीच्या विभागीय संचालक पदाचा कार्यकाळ संपला. यावेळी त्यांनी मुदतवाढ मागितली नसल्याचेही सांगण्यात आले. परंतू लाखो रुपये खर्चून पीआर एजन्सीच्या माध्यमातून अशा बातम्या माध्यमांमधून पेरल्या जात आहेत. एनसीबीने समीर वानखेडे (खान) यांना मुदतवाढ दिली नसली तरी राज्यातील काही भाजप नेते वानखेडे इथेच राहावेत यासाठी दिल्लीत लॉबिंग करत आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

<div class="paragraphs"><p>Nawab Malik&nbsp;</p></div>
समीर वानखेडेंचा एनसीबीचा कार्यकाळ संपला; अशी होती वानखेडेंची कारकीर्द

तसेच, हे भाजप नेते कोण आहेत, याचाही मी शोध घेणार आहे. लवकरच त्यांनाही मी एक्सपोज करणार असल्याचं नवाब मलिकांनी इशाराच दिला आहे. समीर वानखेडे इथेच राहावेत आणि आपल्याला आणखी फर्जीवाडे करता यावेत यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एनसीबी ने अनेक फर्जीवाडे करुन खोट्या केसेस दाखल केल्या. लोकांना त्यात फसवले गेले. मोठी वसुली करण्यात आली. मी फर्जीवाडे बाहेर काढल्यानंतर मलाही धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्यावर मानहानीची केस दाखल करण्यात आली. पण न्यायालयाने जर कोणती राष्ट्रीय यंत्रणा काही चूकीचे करक असेल तर त्यावर बोलण्याचा मला अधिकार दिला असल्याचंही त्यांनी म्हटंल आहे.

दरम्यान याचवेळी नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि एका पंचाचे संभाषणाचे दोन ऑडियो क्लिपगही शेअऱ केले आहेत. एनसीबी प्रामाणिक संस्था असेल तर संस्थेने मला उत्तर द्यावे, असे आवाहन मंत्री मलिकांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com