Rohit Pawar On Baramati Agro : बारामती ॲग्रोच्या कारवाईमागे भाजपच्या बड्या नेत्याचा हात; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ!

Rohit Pawar On Baramati Agro : "योग्य वेळ येऊद्या सर्व काही बाहेक काढणार..."
Rohit Pawar On Baramati Agro
Rohit Pawar On Baramati Agro Sarkarnama

Rohit Pawar On Baramati Agro : 'बारामती ॲग्रो'चे सीईओ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील प्लांटवर प्रदूषण मंडळाने कारवाई करण्यासंदर्भातील नोटीस पाठवली होती. ही नोटीस राजकीय हेतूंनी प्रेरित होती, असा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर आता त्यांनी पुन्हा एकदा सूचक भाष्य करुन भाजपच्या एका बड्या नेत्याचं यात हात असल्याचा दावा केला आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rohit Pawar On Baramati Agro
Rohit Pawar News : रोहित पवार लवकरच मोठा धमाका करणार; 'त्या' दोन नेत्यांची नावे सांगणार

एका खासगी मराठी वृत्तवाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बारामती ॲग्रोच्या कारवाई संदर्भात हे भाष्य केले आहे. रोहित पवार म्हणाले, "बारामती ॲग्रोवर कारवाई संदर्भात मुख्यमंत्र्यांचा कुठेही हस्तक्षेप नाही, हे मला शिंदे गटाच्या एका नेत्याकडून कळालं. मात्र, यामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्तेच्या बाजूला गेलेले एक नेते आणि भाजपचा एक मोठा नेता या कारवाईमध्ये त्यांचा हात आहे. यांनीच इतर विभागांना सांगितलं गेलं की, रोहित पवारांवर सगळीकडून कारवाई करा, असा गौप्यस्फोट केला.

Rohit Pawar On Baramati Agro
Thane NCP : शरद पवार गटाकडून तरुणांची फळी उभारण्याचा प्रयत्न; ठाणे राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर

या कारवाईमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्याचा नाव काय आहे, असं विचारले असता, रोहित पवारांनी आता तूर्त तरी ती नावे सांगायचे टाळले. ते दोन नेते कोण असा प्रश्न विचारला असता, 'योग्य वेळी त्यांची नावे सांगेन," असे रोहित पवार म्हणाले. यामुळे भाजपचा तो नेता कोण? याबाबत आता चर्चा सुरु झाली आहे.

कारवाई विरोधात रोहित पवारांची पावलं

'बारामती ॲग्रो'च्यावतीने हायकोर्टात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली होती. यावेळी त्यांनी कारवाईबाबत काही अंशी दिलासा मिळाला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने 'बारामती ॲग्रो'च्या 'डिस्टलरी प्लांट'ला नोटीस बजावत पुढील 72 तासांत प्लांट बंद करावा, असे आदेश नोटिशीद्वारे दिले गेले होते. ही कारवाई राजकीय हेतूंनी केले गेले होते, असा आरोप रोहित पवारांनी केला होता.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com