फडणवीसांची डिनर डिप्लोमसी; संभाव्य मंत्री सागर बंगल्यावर दाखल

Devendra Fadnavis : शिंदे सरकारचा उद्या मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे
Devendra Fadnavis Latest Marathi News
Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

Devendra Fadnavis : मुंबई : शिंदे सरकारचा महिनाभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या (8 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजप (BJP) आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे. या आमदारांना सकाळीपासून फोन गेले आहेत. त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आज रात्री हे स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. भाजपकडून कुणाकुणाला फोन गेले याची काही नावे समोर आली आहेत.

Devendra Fadnavis Latest Marathi News
गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, किशोर पाटील यांना जळगाव जिल्ह्यातून मंत्रिपदाची माळ?

त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, सुरेश खाडे, रविंद्र चव्हाण यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार हेही सागर बंगल्यावर पोहचले आहे. या संभाव्य मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले आहे.

Devendra Fadnavis Latest Marathi News
भाजपमधील इच्छुकांनी फोनचे चार्जिंग उतरू दिले नाही.. फडणवीसांचा नंबर तोंडपाठ झाला!

चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिल्यास, प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या नेत्याला दिले जाऊ शकते. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अशावेळी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे आशिष शेलार यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिंदे गटातील 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट, उदय सामंत यांना फोन गेल्याची माहिती आहे. त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com