Kalyan-Dombivli News : ...तो पर्यंत शिंदे गटाला सहकार्य करणार नाही; खासदार शिंदेंच्या मतदारसंघातच भाजप आक्रमक

bjp Shivsena News : भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
Bjp, Shivsena News
Bjp, Shivsena News Sarkarnama

Ravindra Chavan News : भाजप नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये जोपर्यंत मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होणार नाही. तोपर्यंत शिवसेना शिंदे गटाला सहकार्य करणार नाही, असा ठराव पारित करण्यात आला आहे.

तसेच या बैठकीमध्ये स्थानिक पातळीवर युती मान्य नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) निषेधाच्या घोषणा दिल्या. यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये कल्याण-डोंबिवलीमध्ये वाद निर्माण झाला आहे. या बैठकीनंतर बोलतना चव्हाण म्हणाले, आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Bjp, Shivsena News
Pandharpur Politic's : वडिलांनंतर... मुलालाही मुख्यमंत्र्यांनी पाठविले विमान ; विजयदादांना पराभूत करणाऱ्या भारत भालकेंसाठीही चव्हाणांनी ‘प्लेन’ पाठविले होते

याबाबत वरिष्ठांशी बोलेन, बदली होणार नाही तोपर्यंत युती करणार नाही, असा ठराव बैठकीमध्ये करण्यात आली. मात्र, त्याबाबत कार्यकर्त्यांची समजूत घातली पाहिजे ती घालू असे चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व रवींद्र चव्हाण यांचे फोटो नव्हते. त्या विषयी विचारले असता चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नाम काफि हैं, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपाच्या वतीने मानपाडा पोलीस ठाण्यावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य मोर्चा काढत शेखर बागडे यांची बदली करा, अशी मागणी केली होती. त्यावरुन आता भाजप अधिक आक्रमक झाल्याचे पाह्याला मिळत आहे.

Bjp, Shivsena News
Raut on Narvekar Statement : सोळा आमदारांबाबत निर्णय लवकरच ; नार्वेकरांच्या विधानावर राऊत म्हणाले, '..तर कोर्टात जाणार'

रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर एका महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होताच भाजपाच्या (BJP) पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी कोणतीही सखोल चौकशी न करता पोलिसांनी हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षातील नेत्यांना लक्ष करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावरुन आता कल्याण-डोंबिवलीमध्ये राजकारण तापले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com