भाजप नेत्यांनी मुंबई महापालिकेत विजयासाठी भराडी देवीला मागितला कौल

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ( Vinod Tawade ), भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार ( Ashish Shelar ) आणि पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी (मालवण) भराडीदेवीचे आज दर्शन घेतले.
 BJP
BJPsarkarnama

मुंबई - मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे ( Vinod Tawade ), भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार ( Ashish Shelar ) आणि पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी (मालवण) भराडीदेवीचे आज दर्शन घेतले. हे दर्शन घेताना महापालिकेत विजय व्हावा असा कौल मागितला. ( BJP leaders ask Bharadi Devi for victory in Mumbai Municipal Corporation )

कोकणवासियांची अपार श्रद्धा असलेल्या भराडी देवीची जत्रा सुरू झाली असून आज आमदार आशिष शेलार यांनी आंगणेवाडीला जाऊन दर्शन घेतले. कोकणातील राजकीय नेते आवर्जून या यात्रेत हजेरी लावून दर्शन घेत असतात. ही देवी नवसाला पावणारी असल्याची श्रध्दा असल्याने देवीकडे कोणी काय मागणे मागितले यावर, याबाबतची रंगतार चर्चा राजकीय वर्तुळात होत असतात.

 BJP
Video: राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, आशिष शेलार

त्यावरूनच देवीला साकडे काय घातले असा प्रश्न माध्यमांनी आमदार अॅड. आशिष शेलार यांना विचारला असता मालवणी भाषेत उत्तर देताना ते म्हणाले की, माझ्या भराडी देवी माते कौल दे, मुंबई महापालिकेत आमका यश यवं दे, टक्केवारी, लुटमार करतले ते हरान दे मुंबैकराची ईडापीडा टळानं दे, या येळेस... 25 वर्षं भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे चाकरमान्यांचे मुंबईत हाल करणाऱ्यांका तेंची जागा दाखन दे! माते कौल दे!! असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com