भाजप नेत्याकडून तरुणीवर अॅसिड फेकण्याची धमकी

संबंधित नेता पिडीत तरुणीला सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवून धमक्या देत असे.
भाजप नेत्याकडून तरुणीवर अॅसिड फेकण्याची धमकी

कल्याण : एका ३४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली भाजपचे (BJP) माजी नगरसेवक संदीप गायकर (Sandip Gaikar) वर्ग न्यायालयाने गायकर यांना 3 डिसेंबपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी प्रकल्याण येथील एका महिलेने ही फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गायकर याने जुन्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील मेसेज व फोटो टाकून सोशल अकाउंटस व व्हॉटस ॲपवर बदनामी केल्याचाही आरोप पिडीताने केला आहे. तसेच, पिडीत तरुणीला सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवून धमक्या देत असे. याशिवाय तरुणीचा पाठलाग करत तिला समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची आणि ॲसिड टाकून चेहरा खराब करण्याची धमकी देत असे. याशिवाय गायकर याने तरुणीच्या चेहऱ्यावर बोचकरुन तिचा विनयभंग केल्याचेही तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत पश्चिमेकडील आधारवाडी चौक, आग्रा रोड आणि वायलेनगर परिसरात हे प्रकार घडल्याचे तरुणीने म्हटले आहे.

भाजप नेत्याकडून तरुणीवर अॅसिड फेकण्याची धमकी
ठाकरे अन् ममता यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप खवळले

गायकर हे मुंबई महापालिकेत 2005 ते 2010 आणि 2015 ते 2020 या कालावधीत नगरसेवक होते. त्यांनी स्थायी समिती सभापतीपदही भुषविले आहे. याप्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, जर कोणी चूक केली असेल तर कायद्यानुसार योग्य ती चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे.

- नागपुरात बलात्कार पीडितेची आत्महत्या

त्याच वेळी, आणखी एका प्रकरणात, महाराष्ट्रातील नागपुरात अल्पवयीन बलात्कार पीडितेने आत्महत्या केली. काही दिवसांपूर्वीच आरोपीची जामिनावर सुटका झाली होती, तेव्हापासून पीडिता नैराश्यात होती. पोलिसांना पीडितेकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. ही संपूर्ण घटना नागपूरच्या जरीपटका भागातील आहे, एका 16 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप आहे. जूनमध्ये मुलीवर बलात्कार झाला होता. मुलगी तिचे वडील, भाऊ आणि सावत्र आईसोबत राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी 1 जून रोजी तिच्या सावत्र आईचा नातेवाईक विकास भुजाडे तिला घेऊन गेला. मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता होती, त्यामुळे सुरुवातीला हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पण एका महिन्यानंतर, 6 जुलै रोजी नागपूर पोलिसांना पीडित मुलगी आणि आरोपी बेंगळुरूमध्ये सापडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com