आता खड्ड्यांसोबत सेल्फी का नाही? आशिष शेलार यांचा राष्ट्रवादीला टोला - bjp leader targets ncp over bad condition of mumbai goa highway | Politics Marathi News - Sarkarnama

आता खड्ड्यांसोबत सेल्फी का नाही? आशिष शेलार यांचा राष्ट्रवादीला टोला

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झालेली असून, यावरुन प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मुद्द्यावरुन आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे. 

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाची यंदा मोठी दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विरोधी पक्षात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने खड्ड्यांसोबत सेल्फी हे अनोखे आंदोलन केले होते. या आंदोलनाची त्यावेळी मोठी चर्चा झाली होती. आता राष्ट्रवादी सत्तेत असून, या मुद्द्यावरुन भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावला आहे. याचबरोबर शेलार यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्रही लिहिले आहे. 

आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी काँग्रेस या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा उपक्रम राबवून आपल्याच सरकारसमोर आरसा का धरीत नाही? भाजपचे सरकार असताना राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा, असे आंदोलन केले होते. या वेळी मुंबईसह महाराष्ट्रभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले तर नाहीच, शिवाय कोकणात जाणारा अख्खा रस्ताच उखडला आहे. आता राष्ट्रवादी आंदोलन का करत नाही? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज राज्य सरकारला ऐकू येत नाही का? 

शेलार यांनी खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्रही लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग पनवेलपासून चिपळूणपर्यंत पूर्णपणे उखडला आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या रस्त्यावरील नव्या पुलांसह सर्व रस्त्यावर डांबरही शिल्लक राहिलेला नाही. महामार्गावर सर्वत्र खड्डे व खडी आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. 

खड्ड्यांमुळे आता परतीच्या प्रवासात असलेल्या चाकरमान्यांचा प्रवासात कंबरेचे आजार जडावण्याची भीती वाटत आहे. किमान आता तरी सरकारने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, असे शेलार यांनी सांगितले . 

ठाकरे सरकारचं कोकणवासीयांकडं दुर्लक्ष ; आशिष शेलारांचा आरोप 

मुंबई : ठाकरे सरकारचं कोकणवासीयांकडे दुर्लक्ष आहे, कोकणात जाण्यासाठी वेळेवर गाड्या उपलब्ध केल्या नाहीत आणि येताना रस्त्याची चाळण झाली आहे, त्यामुळे त्यांचे हाल होत असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. याबाबत शेलार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे.  या व्हिडिओमध्ये आशिष शेलार म्हणतात, "ठाकरे सरकार चाकरमान्यांवर आणि कोकणवासीयांवर कुठला राग काढताहेत हेच समजत नाही. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ई-पास आणून दलालाच्या हातात कोकणवासीयांची मान दिली. वेळेत रेल्वे आणि बसची सेवा सुरू न करता खासगी सेवा घ्यावी लागली. त्यामुळे कोकणवासीयांचा आर्थिक कणा मोडला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख