उमेदवारी अन् छत्रपतींच्या सन्मानाचा संबंध नाही! मुनगुंटीवारांच्या गुगलीनं चर्चेला उधाण

शिवसेनेकडून राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव फायनल झाले आहे.
MLA Sudhir Mungantiwar
MLA Sudhir MungantiwarSarkarnama

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेसाठी शिवसेना (Shivsena) पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, यातच भाजप (Bjp) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चा सुरु झाली आहे. (Sudhir Mungantiwar Latest News Marathi)

मुनगंटीवार म्हणाले, राज्यसभा (RajyaSabha) उमेदवारीचे तिकीट आणि छत्रपती घराण्याचा सन्मान या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडणे गैर आहे, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. छत्रपती घराण्याला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात सन्मान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती छत्रपती घराण्याचा सन्मान करते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. एका वर्तमानपत्राने या संदर्भात बातमी दिली आहे.

MLA Sudhir Mungantiwar
संजय राऊतांचा सत्तेचा माज शिवप्रेमी जनता उतरवेल : मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

उमेदवारीचे तिकीट व छत्रपतींचा सन्मान या गोष्टी जोडायची गरज नाही. निवडणुकीचे तिकीट हा वेगळा भाग आहे. कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्तीच्या मनात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्याविषयी प्रेमच आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, शिवसेना एक कडवट मावळा राज्यसभेत पाठवणार आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आता संपला आहे. शिवसेना आता संभाजीराजे यांच्या ऐवजी संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे फायनल झाले आहे. संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा लवकर होईल, असेही राऊत यांनी सांगितले.

MLA Sudhir Mungantiwar
विषय संपला : शिवसेनेचा दुसरा उमेदवार फायनल; दोन संजय जाणार राज्यसभेत

संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण कोल्हापूरातीलच संजय पवार हे नाव अचानक चर्चेत आले होते. संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांकडे पाहिले जाते. कोल्हापूर महापालिकेत ते नगरसेवकही होते. मराठा उमेदवार देऊन शिवसेनेने समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com