अजितदादा, शेजाऱ्याचे अनुकरण करा! मुनगंटीवार यांनी दिला सल्ला

विधानसभेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी विविध मुद्यांवरून अजित पवारांवर निशाणा साधला.
Sudhir Mungantiwar, Ajit Pawar

Sudhir Mungantiwar, Ajit Pawar

Sarkarnama

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत अध्यक्षांच्या निवडणुकीसह कोरोना, पेट्रोल-डिझेलचे दर यावरून जोरदार चर्चा झाली. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना काळात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि राज्यातील इंधन दरावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

पेट्रोलच्या दरावरून (Petrol Price) बोलताना आंध्र प्रदेश, गुजरात, आसामधील पेट्रोलचे दर सांगत मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी महाराष्ट्रातील पेट्रोलच्या दराशी तुलना केली. शेजारची राज्य जर दर कमी करू शकतात तर महाराष्ट्र का करू शकत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपली आई, आजी, आजोबा इतरांकडून, शेजारच्यांच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याचे सांगतात. ते कधीच वाईट शिकवत नाहीत. मग पेट्रोल दराबाबत असं अनुकरण करायला नको का, असा टोला मुनगंटीवार यांनी अजितदादांना (Ajit Pawar) लगावला.

<div class="paragraphs"><p>Sudhir Mungantiwar, Ajit Pawar</p></div>
रामदास कदमांना विधान भवनाच्या गेटवरच अडवलं! शिवसेना नेत्यांची पळापळ

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर 22 राज्यांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. देशाला, अमेरिकेसमोर आर्थिक अडचण आहे. फक्त महाराष्ट्रालाच अडचण नाही. राज्यात मात्र पेट्रोलचा एकही पैसा कमी करणार नाही ही भूमिका लोकांच्या हातात पेट्रोलची बाटली दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला दिला.

<div class="paragraphs"><p>Sudhir Mungantiwar, Ajit Pawar</p></div>
एकनाथ शिंदे विधान भवनात गडबडीने आले, पण एक चूक झाली अन्...

अजितदादा मास्क घालायला सांगतात, मग...

मुनगंटीवार यांनी कोरोना (Corona) काळातील भ्रष्टाचारावरूनही सभागृहात टीका केली. अजित पवार सर्वांना मास्क घालायला सांगतात, पण कोरोनाच्या भ्रष्टाचाराबाबत सरकार बोलत नाही. चाळणीत पाणी भरणाऱ्यासारखे सरकारचे काम सुरू आहे. चाळणीची छिद्र बंद केल्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणार नाही. सॅनिटाझरच्या मशिनमध्ये सॅनिटायझरच नसते, अशी स्थिती झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपकरणं, औषधे मिळत नाही, हा मुद्दाही मुगंटीवार यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com