'ज्येष्ठ नेत्यांचे संस्कारच मिटकरींपर्यंत पाझरले'

NCP|BJP: विशिष्ट समाजातील थोर संत, इतिहासकार आदींचा राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासून अपमान केला आहे, अशी टीका भाजपच्या शीतल देसाई यांनी केली आहे.
'ज्येष्ठ नेत्यांचे संस्कारच मिटकरींपर्यंत पाझरले'
Sheetal Desai, BJPsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) कनिष्ठ नेते जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल करतात आणि वरिष्ठ मंत्री व्यासपीठावरून खिदळून त्यांना उत्तेजन देतात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे संस्कारच मिटकरी (Amol Mitkari) यांच्यापर्यंत पाझरले आहेत, अशी टीका मुंबई भाजप (BJP) महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल देसाई यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्याचा प्रसंग नुकताच घडला. त्या सभेत मागे बसलेले मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) व धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे त्या वक्तव्यावर खिदळत असल्याचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यात मोठा असंतोष निर्माण झाला असून मिटकरी यांच्याविरुद्ध काही ठिकाणी पोलीस तक्रारही झाली आहे, अशी टीका देसाई यांनी केली आहे.

Sheetal Desai, BJP
ओवेसींच्या सभेला परवानगी मग राज ठाकरेंना का नाही?

मुळात अल्पसंख्य असल्याने ज्यांच्या मतांची फारशी गरज नाही, अशा शांतताप्रिय समाजाविरुद्ध टीका करून आपण पुरोगामी व सेक्युलर आहोत, असे दाखवणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्यापासूनच धोरण राहिले आहे. त्यातूनच विशिष्ट समाजातील थोर संत, इतिहासकार आदींचा राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यापासून अपमान केला आहे. पुरंदर किल्ल्याएवढी थोरवी असलेल्या एका शिवभक्त इतिहासकारावर राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेली लांछने खोटी असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तरीही त्यापासून काहीही धडा न घेता आता हिंदू पुरोहितांवर टीका करुन समाजात जातीय द्वेष पसरविण्याचे काम राष्ट्रवादी करीत असल्याचे देसाईंनी म्हटलं आहे.

Sheetal Desai, BJP
'शरद पवार यांनी लक्ष घातले तर उदगीर जिल्हा होऊ शकतो'

राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची धोरणेच कनिष्ठ पातळीवरचे नेते-कार्यकर्ते पुढे चालू ठेवणार हे उघड आहे. मग वरिष्ठ नेतृत्वाने राज्यातील संत-इतिहासकार यांच्यावर केलेली अप्रत्यक्ष टीका असो किंवा स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा "श्रीमंत" असा उल्लेख, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना, वाचण्याचा मक्ता अजूनही फक्त विशिष्ट वर्गाकडे आहे, असे वाटते. अशा आशयाची त्यांच्यावर केलेली टीका असो, यातूनच कनिष्ठ नेतृत्व धडा घेणार हे उघड आहे. त्यामुळे अशी बेताल बडबड करणाऱ्या कनिष्ठ नेतृत्वाला तोंड मिटण्यास पक्षाध्यक्ष शरद पवारांनी सांगावे, अश्या शब्दात देसाईंनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.