Pravin Darekar News
Pravin Darekar NewsSarkarnama

सीसीटीव्हीत पाहिलंय ते शिवसेनेचेच होते! प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

शिवसेनेचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी भाजपने पोलखोल मोहीम सुरू केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेनेचा (Shivsena) भ्रष्टाचार उघड करण्यासाठी मुंबई भाजपने (BJP) पोलखोल मोहीम सुरू केली आहे. भाजप कार्यालयात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत पोलखोल अभियानाच्या रथ यात्रेची सुरुवात होणार होती. मात्र, त्याआधीच अज्ञातांकडून रथाचे नुकसान करण्यात आले होते. या प्रकरणी दरेकरांनी आता मोठा गौप्यस्फोट केला आहे.

प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे की, आम्ही पोलिसांना इशारा दिल्यानंतर त्याची दखल घेत आता एफआयआर दाखल झाला आहे. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यातही घेण्यात आलं आहे. युवा सेनेचा एक पदाधिकारी सीसीटीव्हीत दिसत आहे. पोलीस त्याची खातरजमा करतील. मुंबई महापालिकेची पोलखोल आम्ही सातत्याने करत आहोत. यातून मागील 25 वर्षांचा काळा इतिहास समोर येईल म्हणून गाडीची मोडतोड करण्यात आली.

Pravin Darekar News
हम किसी को छेडेंगे नही, पर किसीने छेडा तो छोडेंगे नही! भातखळकरांचा शिवसेनेला इशारा

पोलखोल यात्रेच्या गाडीचे नुकसान हे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. गाडीची फोडतोड करणाऱ्यावर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर या ठिकाणी भाजप चे सगळे नेते एकवटतील आणि जनतेच्या रोषाला सरकारला समोर जावं लागेल, असा इशाराही लाड यांनी दिला आहे.

Pravin Darekar News
कोरोनाचा कहर वाढताच पुन्हा मास्क सक्ती; पाचशे रुपयांचा दंडही होऊ शकतो

लाड म्हणाले की, भाजपकडून महाविकास आघाडी सरकारची पोलखोल करण्यात येत आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रात्रीच्या अंधारात हा पाठीमागून हल्ला करण्यात आला आहे. ज्याप्रकारे 2019 ला पाठीत खंजीर खुपसण्याच काम त्यांनी केलं, तशाच प्रकारचा हा हल्ला त्यांच्याकडून करण्यात आला आहे. माझे त्यांना आव्हान आहे की, हिंमत असेल तर समोर येऊन दगड मारून दाखवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in