सलग दुसऱ्या सोमवारी पोलिसांनी चौकशी केली अन् दरेकर म्हणाले, माझा छळवाद मांडलाय!

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे अडचणीत आले आहेत.
Pravin Darekar News, Mumbai Bank fraud case news updates
Pravin Darekar News, Mumbai Bank fraud case news updatesSarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात दरेकरांना पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावले होते. यानुसार आज दरेकरांनी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. मागील आठवड्यातही दरेकर चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले होते. आज त्यांची तीन ते चार तास चौकशी करण्यात आली. (Pravin Darekar News)

या चौकशीनंतर बोलताना दरेकर म्हणाले की, छळवाद मांडण्याच्या दृष्टीने सरकारच्या दबावाखाली पोलिसांची मानसिकता दिसतेय. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही लोकशाही मानणारे भाजपचे लोक आहोत. संजय राऊतांसारखा आक्रस्ताळेपणा आम्ही करणार नाही. त्यांच्या लोकांना चौकशीला बोलावल्यानंतर काय नंगानाच करतात हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. आमच्यावर कार्यकर्ता म्हणून कायद्याचे पालन कऱण्याचे संस्कार आहेत. पोलिसांना सहकार्याची आमची भूमिका आहे. त्यादिवशी तीन-चार तास चौकशी झाली आणि आजही तीन-चार तास चौकशी झाली. अजूनही बोलावले तर मी चौकशीला हजर राहीन.

पोलीस कोठडी कशासाठी हवी, असा सवाल करून दरेकर म्हणाले की, सरकारला या ठिकाणी छळवाद मांडायचाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होतेय म्हणून सूड भावनेतून ही कारवाई सुरू आहे. पोलिसांची मानसिकता दबावाखाली वाटली. अर्धा तास- एका तासाची माहिती असताना जाणीवपूर्वक सरकारच्या दबावाखाली जास्त वेळ बसवून ठेवलं जात आहे. चौकशी करण्याच्या नावाखाली हा छळवाद मांडला आहे.

Pravin Darekar News, Mumbai Bank fraud case news updates
राज ठाकरेंची भेट होताच वसंत मोरे म्हणाले, सगळ्या ऑफर संपल्या!

मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणात पोलिसांनी दरेकरांना पुन्हा एकदा समन्स बजावले. याआधी 4 एप्रिलला दरेकरांनी रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावली होती. दरेकर आज पुन्हा चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाले. यामुळे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी सुरू केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना तंबी दिल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी बंद केली होती.

Pravin Darekar News, Mumbai Bank fraud case news updates
भाजपच्या दरेकरांनी आता विश्वास नांगरे-पाटलांना आणलं अडचणीत!

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com