सहकार विभागाच्या कारवाईआधीच दरेकरांनी दिला पदाचा राजीनामा

प्रवीण दरेकर मजूर नसल्याचा ठपका सहकार विभागाने ठेवला आहे.
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँकेच्या निवडणुकीत (Mumbai District Bank Election) विद्यमान अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, निकाल लागल्यानंतर लगेचच सहकार विभागाने ते मजूर नसल्याचे सांगत अपात्र ठरवले आहे. त्यानुसार कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. पण ही कारवाई होण्याआधीच दरेकरांनी मोठं पाऊल उचललं आहे.

सहकार विभागाच्या या कारवाईनंतर दरेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. दरेकर म्हणाले, सरकार विभागाने अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात केवळ डीडीआरला सुचना दिल्या आहेत. कारवाई झालेली नाही. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे. सभासदत्व या संज्ञेविषयी लाखोंच्या मनामध्ये संभ्रम आहे. सरकारशी समन्वय साधत हा संभ्रम दूर करावा लागणार आहे.

Pravin Darekar
काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार; पंतप्रधान मोदींना दाखवला होता काळा झेंडा

मी राज्याचा विरोधी पक्षनेता असल्याने काही माध्यमांना हाताशी धरत ठराविक लोकांना पुढे आणले जात आहे. व्यक्तिगत द्वेषातून हे सुरू आहे. छोबीपछाड दिल्यानंतरही काही जणांच्या पोटात दुखत असेल तर मी काही करू शकत नाही. सर्व 21 जागा माझ्या नेतृत्वाखाली निवडून आल्या आहेत. आता वरातीमागून घोडे नाचवले जात आहे. मी दोन ठिकाणी निवडून आलो आहे. महाराष्ट्रात क्वचितच एखादं असं उदाहरण असेल.

सहकारी संस्था कायदा 1960 दोन मतदारसंघात निवडून आल्यानंतर तीस दिवसांच्या आता एका मतदारसंघातून राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे मी कालच निकाल घोषित झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनामा मागण्याचीही तसदी घेऊ दिली नाही, असं दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. मजूराने श्रीमंत होऊ नये का, असं कुठे लिहिलेले नाही. धीरूभाई अंबानी ओझे उचलणारे कामगार होते. आता त्यांचे कुटूंब जगातील श्रीमंत कुटुंब झाले आहे, असं सांगत दरेकरांनी विरोधकांवर टीका केली. दरेकर हे मजूर संस्था गटासह अर्बन बँक गटातून निवडून आले आहेत.

Pravin Darekar
निमित्त महापौर पदाच्या निवडणुकीचं; काँग्रेसला मिळणार नवा राजकीय भिडू

दरम्यान, मुंबै बँकेसाठी प्रवीण दरेकर यापूर्वी मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच निवडून आले होते. यावेळी देखील त्यांनी मजूर प्रवर्गातूनच अर्ज भरला होता. मात्र यंदा त्यावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दरेकर यांना सहकार विभागाने नोटीसही बजावली होती. 'या नोटिशमध्ये 'आपण मजूर आहात की नाही,' अशी विचारणा करण्यात आली होती. आता चौकशीनंतर प्रवीण दरेकर मजूर नसल्याचे सांगत म्हणून त्यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. मजुरीचे काम न करणाऱ्या सभासदांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे,'' असे आदेश उच्च न्यायालयाकडूनही देण्यात आले होते.

Pravin Darekar
महाविकास आघाडीची गोव्यातही हवा; राजकीय हालचालींना वेग

मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारिरीक श्रमाचे काम करणारा व्यक्ती असून तिचे उपजीविकेचे साधन मजुरीवर अवलंबून असले पाहिजे. मात्र दरेकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी याच प्रतिज्ञापत्रात आपल्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले आहे. दुसरीकडे विधान परिषद सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र ठरवताना याच बाबींकडे लक्ष वेधत तुम्हाला मजूर म्हणता येणार नाही असे आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com