नाना पटोले तोंडाची वाफ घालवण्या पलिकडे काहीही करू शकत नाहीत; दरेकरांचा टोला

सत्तेतून बाहेर पडण्याची त्याच्याकडे हिंमत आहे का?
नाना पटोले तोंडाची वाफ घालवण्या पलिकडे काहीही करू शकत नाहीत; दरेकरांचा टोला
Praveen Darekar and Nana Patolesarkarnama

भंडारा : भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia) पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमच्या पाठीत सुरा खुपसला असल्याची जहरी टीका काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. यावर भाजप (BJP) नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी पटोले हे आरोप करण्या पलिकडे काही करू शकत नाहीत. सत्तेतून बाहेर पडण्याची त्यांच्याकडे हिंमत नाही. त्यामुळे ते शाब्दिक आरोपच करू शकतात, अश्या शब्दात दरेकरांनी पटोलेंना डिवचले आहे.

Praveen Darekar and Nana Patole
पटेल-पटोले वादाचा भाजपला फायदा; काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांच्या पाठीत खुपसला खंजीर

दरेकर म्हणाले, आता त्यांना खंजीराच्या पण गुदगुल्या होत असतील. तर त्याला आम्ही काय म्हणायचं? एकाबाजूला खंजीर खुपसला म्हणायचं आणि दुसरीकडे मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं. सत्तेतून बाहेर पडण्याची पटोलेंकडे आणि कॅाग्रेसकडे हिंमत आहे का? तर नाही. त्यामुळे पटोले हे फक्त तोंडाची वाफ घालवण्या पलिकडे काहीही करू शकणार नाही, ते एकमेकांमध्ये वाद घालतील आणि सत्तेतही सोबत राहतील आणि आम्ही एकमेकांना घट्ट पकडून आहोत, असे ते म्हणतील, त्यामुळे त्यांच्या वादावर आम्ही फार जास्त बोलणार नाही, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

Praveen Darekar and Nana Patole
राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर पटोले म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यासोबत माझे बोलणे झाल्यावरही त्यांनी प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये सुद्धा राष्ट्रवादी भाजपसोबत जाऊन राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.

तर भंडारा जिल्हा परिषदेतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थाप करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. मात्र, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे नाना पटोले जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात यशस्वी झालो, असा आरोप त्यांनी केला होता.

Praveen Darekar and Nana Patole
ममतांना साहित्य अकादमी पुरस्कार : बंगाली लेखिका संतप्त ; पुरस्कार परत

यावर आता विरोधी पक्ष भाजपकडून टीका करण्यात येत असून महाविकास आघाडीतून सत्तेत असलेल्या कॅाग्रेसमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नसल्याची टीका करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत कॅाग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.