पंकजा मुंडे संभाजीराजेंच्या पाठिशी; राज्यसभा निवडणुकीबाबत स्पष्ट सांगितलं...

संभाजीराजे छत्रपती आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
पंकजा मुंडे संभाजीराजेंच्या पाठिशी; राज्यसभा निवडणुकीबाबत स्पष्ट सांगितलं...
Sambhajiraje Chhatrapati Latest News Update, Pankaja Munde Latest Marathi News Sarkarnama

Sambhajiraje Chhatrapati latest news update

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. पण कोणत्याही पक्षाने त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही. त्यामुळे ते निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या आहेत. (Pankaja Munde Latest Marathi News)

राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीसाठी संभाजीराजे यांनी शिवबंधन हाती बांधावे, असा प्रस्ताव शिवसेनेकडून त्यांच्यासमोर ठेवला होता. पण संभाजीराजेंनी त्यास नकार दिल्याने शिवसेनेने कोल्हापूरातील संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संभाजीराजे हे अपक्ष अर्ज भरतील, अशी दाट शक्यता होती. पण प्रत्यक्षात ते माघार घेण्याची शक्यता वाढली. याबाबत ते शुक्रवारी अधिकृत घोषणा करू शकतात.

Sambhajiraje Chhatrapati Latest News Update, Pankaja Munde Latest Marathi News
अपमानास्पद पदावरून मुक्त करा! काँग्रेस मंत्र्याचीच मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पंकजा मुंडे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आवाहन महाविकास आघाडीला केले आहे. त्या म्हणाल्या, 'उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत जी भूमिका सरकारने घेतली होती, त्याचं आम्ही स्वागतच केलं होतं. एका छत्रपतींना आम्ही राज्यसभेवर पाठविले आहे. आता तुम्ही दुसऱ्या छत्रपतींना राज्यसभेत पाठवावे. ते छत्रपती असून त्यांना मान खाली घालायला लावू नका.'

दरम्यान, राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या हेतूने मैदानात उतरलेले संभाजीराजे माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या.

Sambhajiraje Chhatrapati Latest News Update, Pankaja Munde Latest Marathi News
राष्ट्रवादीचा बसपला धक्का; नगरसेविकेसह माजी नगरसेवक पतीचा पक्षप्रवेश

संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ते शिवसेनेला लक्ष्य करणार की अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आव्हान निर्माण करणार, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in