उद्धवजींमध्ये राहुल गांधी दिसतात ; राणेंचा खोचक टोला

नितेश राणेंनी (Nitesh Rane) टि्वट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये (Uddhav Thackeray) राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही.''
Uddhav Thackeray, (Nitesh Rane
Uddhav Thackeray, (Nitesh Ranesarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात (shivsena dasara melava) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेबाजी केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही ठाकरेंवर टीका करुन तोंडसुख घेत असल्याचे चित्र आहे. भाजप व भाजच्या नेत्यावर काल उद्धव ठाकरे यांनी टीकचे बाण सोडले. त्यांच्या टीकेला भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर देत ठाकरेंची तुलना कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत केली.

नितेश राणेंनी (Nitesh Rane) टि्वट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''दसरा मेळाव्यानंतर आता पूर्ण आत्मविश्वासानं सांगू शकतो, आम्हाला उद्धवजींमध्ये (Uddhav Thackeray) राहुलजी एकदम स्पष्टपणे दिसतात. यात कोणतीही शंका नाही.''

Uddhav Thackeray, (Nitesh Rane
किती निष्ठावान शिवसैनिक मंत्रिमंडळात आहेत ? भाजपचा ठाकरेंना सवाल

''आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आमचा आवाज दाबणार कधी जन्माला येऊ शकत नाही. काहीजण माझं भाषण संपण्याची वाट पाहत आहेत भाषण कधी थांबतय आणि कधी एकदा चिरकतोय अशी काहींची अवस्था झाली आहे,'' अशा शब्दात ठाकरेंनी काल भाजपवर निशाणा साधला होता. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी काल दसरा मेळाव्यात (shivsena dasara melava) केलेल्या भाषणावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे. अतुल भातखळकर, आशिष शेलार यांच्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणाचा समाचार घेतला.

''भाजप सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते,'' असा सवालही दरेकर यांनी केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस व भाजप विषयीचा टोकाचा तिरस्कार वारंवार व्यक्त होताना दिसत होता, अशी टीका नेते प्रवीण दरेकर (bjp pravin darekar) यांनी केली.

Uddhav Thackeray, (Nitesh Rane
'सावरकर समलैंगिक होते, असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्ही बसलात ; ठाकरेंवर घणाघात

प्रवीण दरेकर म्हणाले की, पंढरपूरच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार समाधान अवताडे व देगलूरच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार सुभाष साबणे हे उपरे आहेत, असे म्हणत असाल तर तुमच्या मंत्रिमंडळात किती कट्टर शिवसैनिक आहेत ? शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळचे किती निष्ठावान शिवसैनिक तुमच्या मंत्रिमंडळात आहेत, याचे उत्तरही शिवसेनेने द्यावे. सध्याच्या मंत्रिमंडळातील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंकरराव गडाख तर खासदार प्रियांका चतुर्वेदी ही मंडळी तर उपरीच आहेत ना?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com