
मुंबई : मातोश्री निवासस्थानाबाहेर अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधातील आंदोलनात 80 वर्षांच्या चंद्रभागा शिंदे या आजीही हिरिरीनं सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्यादिवशी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबीयांसह त्यांच्या घरी गेले. या आजींच्या घरातील फोटो ट्विट करत भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा आजींच्या घरातील फोटो ट्विट केला आहे. 'ज्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले त्या घरात डोक्यावर अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्याला व बीएमसीला दिसला नाही. दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? तुमच्या घरात तसा कोण संघर्ष करणारा शिल्लक पण राहिला नाही, पळून जाल मुंबई सोडून', अशी टीका त्यांनी केली आहे.
निलेश यांच्या या टीकेवरून काही युझर्सनी नाराजीही व्यक्त केली आहे. काय राणे साहेब .. एवढं बेकार राजकारण ?? ही अपेक्षा नव्हती. त्या गरिबांचा माळा दिसला? तुम्हा सगळ्या भाजपा ते काँग्रेस मधील सगळ्या नेत्यांच्या बेकायदेशीर प्रॉपर्टी आधी बाहेर काढल्या पाहिजे ..मग आम्हा गरीबांनी बेकायदेशीर का असेना पण कष्टाच्या पैशाने बांधलेला माळा पाडा, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
या प्रतिक्रियेनंतर राणेंनी त्याला उत्तर दिलं. 'माझं म्हणणं तेच आहे जो न्याय आजीला आहे तोच न्याय सगळ्या गरिबांना मिळावा, गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला तेव्हा कोण त्यांच्या घरांसाठी बोललं नाही आणि दुसरं ठराविक नेत्यांचीच कशाला सगळ्या नेत्यांची अनधिकृत घरं पाडून टाका पण गरिबाचं घर पडता कामा नये, असं निलेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील राणे कुटुंबाच्या घराला मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. घरात अनधिकृत बांधकाम असल्याचे दावा करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याची पाहणीही केली होती. त्यावरून निलेश राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या कारवाईविरोधात राणे न्यायालयातही गेले होते. यावरून बरंच राजकारण रंगलं होतं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.