चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो!

कालच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते.
Nilesh Rane, Uddhav Thackeray
Nilesh Rane, Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात (shivsena dasara melava) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांनी विरोधकांना टोलेबाजी केली. त्यानंतर भाजप नेतेही ठाकरेंवर टीका करुन तोंडसुख घेत असल्याचे चित्र आहे. भाजच्या नेत्यावर काल उद्धव ठाकरे यांनी टीकचे बाण सोडले. त्यांच्या टीकेला भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत चायना मध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, असा टोला लगावला आहे. (BJP leader Nilesh Rane criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

त्या संदर्भात निलेश राणे यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, कालच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुखाचे भाषण होते की रडगाणं होते. इतका रड्या प्रमुख दुसरा नाही. नेहमीची किर किर, आदळ आपट पण निष्पन्न शून्य. म्हणे मी राजकारणातून बाजूला झालो असतो, बरं झाले असते महाराष्ट्र वाचला असता. चायनामध्ये बनवलेला पक्षप्रमुख वाटतो, total waste of time, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Nilesh Rane, Uddhav Thackeray
कार्यकारी बैठकीत वादळ : सोनिया गांधींच्या आक्रमक भूमिकेपुढे नेते निरुत्तर

दरम्यान, ''आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आमचा आवाज दाबणार कधी जन्माला येऊ शकत नाही. काहीजण माझे भाषण संपण्याची वाट पाहत आहेत भाषण कधी थांबतय आणि कधी एकदा चिरकतोय अशी काहींची अवस्था झाली आहे,'' अशा शब्दात ठाकरेंनी काल भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. त्यावर निलेश राणेंनी प्रत्युत्तर देताना ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

Nilesh Rane, Uddhav Thackeray
राहुल गांधींची भेट झाली अन् सिद्धूंनी तलवार म्यान केली!

शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उडवली आहे. अतुल भातखळकर, आशिष शेलार यांच्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्याच्या भाषणाचा समाचार घेतला. ''भाजप सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते,'' असा सवालही दरेकर यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस व भाजप विषयीचा टोकाचा तिरस्कार वारंवार व्यक्त होताना दिसत होता, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com