राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात फटके मारा ; राणे संतापले

आमदार राजू नवघरे (Raju Navghare) यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
  Nilesh Rane
Nilesh Rane sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) आमदार राजू नवघरे (Raju Navghare) यांचा एक व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नवघरे यांच्यावर या व्हिडिओवरुन टीका होत आहे. भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत राणेंनी टि्वट केलं आहे.

''राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्याना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात,'' अशा शब्दात राणेंनी नवघरे व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर संतापले आहेत.

हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) घोड्यावर चढून नवघरे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी माफीही मागितली. माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे यांच्या या गंभीर चुकीवर सर्वत्र टीका होत आहे.

“मी अठरा पगड जातीला मानणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो तेव्हा माजी आमदार मुंदडा साहेब हे देखील तिथे होते. त्यांनीच मला घोड्यावर वर चढवलं. तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणाले, त्यानंतर डॉ. जयप्रकाश मुंदडाही वर चढले. पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझ्या चूकीसाठी मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही,” असं राजू नवघरे म्हणाले.

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपांवर NCBचे वानखेडे म्हणाले..

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एनसीबीवर गंभीर आरोप केले. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना काही कागदपत्रांचे पुरावे दाखविले. यावेळी मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केला. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन जावई समीर खानच्या अटक प्रकरणावरुन समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे. याबाबत समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडेंना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, '' नवाब मलिकांना जे काही करायचे आहे ती त्यांची इच्छा आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com