वळसे पाटलांच्या निर्णयानंतर मोहित कंबोज आले बॅकफूटवर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज आक्रमक झाले होते.
Mohit Kamboj
Mohit KambojSarkarnama

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) आक्रमक झाले होते. त्यांच्याकडून देशातील मंदिरांना भोंग्यांचे वाटप केले जात आहे. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कंबोज बॅकफूटवर गेले आहेत.

मोहित कंबोज यांनी वळसे पाटील यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'दिलीप वळसे पाटील यांनी आज मंदिर असो किंवा मशीद असो लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. येत्या काळात मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्यासाठी जी नियमावली तुम्ही ठरवणार आहात, तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी, असंही कंबोज यांनी म्हटलं आहे.

Mohit Kamboj
शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दणका

त्याचप्रमाणे 80 टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत. 20 टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत. त्यामुळे मदरशांवरील लाऊडस्पीकर हे काढून टाकले पाहिजेत. अनधिकृत मशिदीला लाऊडस्पीकरची परवानगी देऊ नये, अशी मागणीही कंबोज यांनी केली आहे. सर्व लोकांनी एकत्रित येऊन ही सामाजिक चळवळ सुरु केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जे काही नियम आहेत ते नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे आणि मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवावे. याची सुरुवात मुंबईतून होईल. मुंबईमधून सर्व देशाला दिशा मिळेल, असंही कंबोज म्हणाले.

दरम्यान, रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये झालेल्या वादातून देशातील अनेक राज्यांमध्ये दंगली उसळल्या होत्या. महाराष्ट्र (Maharashtra) त्याला अपवाद ठरला आहे. पण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे तणावाचे वातावरण निर्माण होण्याची भीती राज्य सरकारला आहे. त्यातूनच येत्या तीन तारखेला काही कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्याचपार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली जाणार असल्याचे समजते.

Mohit Kamboj
आज ठरणार सदावर्तेंचा पुढचा मुक्काम?

गृह खात्याने याबाबत निर्णय घेतला असून सर्व जिल्हा व शहर पोलिसांना (Police) याबाबत कळवल्याचे समजते. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांड्ये यांनी याबाबतचे आदेशही काढले आहे. परवानगी न घेतल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. आदेशाचे पालन न केल्यास तुरूंगावासही होऊ शकतो. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर मनसेकडून काय प्रतिक्रिया येणार हे महत्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com