शिवसैनिकांनी हल्ला करताच कंबोज यांची पोलिसांकडे धाव अन् म्हणाले, मी घाबरत नाही!

कंबोज हे मातोश्रीची रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता.
Mohit Kamboj
Mohit KambojSarkarnama

मुंबई : भाजपचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर काल (ता. २२ एप्रिल) रात्री सव्वानऊच्या सुमारास शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यात कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले मात्र, कुणालाही दुखापत झालेली नव्हती. यानंतर आज कंबोज यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे. शिवसैनिकांनी मला ठार मारण्याचा कट रचला होता, असा गंभीर आरोप कंबोज यांनी केला आहे. कंबोज यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

यानंतर कंबोज यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याची माहिती त्यांनीच ट्विटरवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या शिवसैनिकांनी काल केलेला हल्ला म्हणजे मला मारण्याचाच कट होता. मी मुंबई पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, लवकरात लवकर या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल करावा आणि दोषींवर कारवाई करावी. मला घाबरवण्याचे काम महाराष्ट्र सरकार करीत असेल तर मी त्यांना सांगतो की मी तुम्हाला अजिबात घाबरत नाही.

Mohit Kamboj
मोठी बातमी : एलआयसीतील भागीदारी विकून मोदी सरकार होणार मालामाल

मुंबईत राणा दांपत्य विरुद्ध शिवसेना असा हाय व्होल्टेज ड्राम कालपासून सुरू आहे. त्यातच काल रात्री कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यामुळे मुंबईतील वातावरण आणखी तापले आहे. मोहित कंबोज हे गाडीतून मातोश्रीजवळ येताच शिवसैनिक आक्रमक झाले. कंबोज हे मातोश्रीची रेकी करण्यासाठी आले आहेत, असा आरोप शिवसैनिकांनी केला . त्यानंतर त्यांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला. कंबोज यांच्या ताफ्यात एकूण पाच गाड्या होत्या. या हल्ल्यात कंबोज यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. पण कोणालाही दुखापत झालेली नाही.

Mohit Kamboj
मी फुकट डोस देण्याची तयारी दाखवूनही मोदी सरकार निर्णय घेईना! पूनावालांचा गौप्यस्फोट

मोहित कंबोज यांच्या झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, अशा प्रकारचा हल्ला होणे, हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. कारण ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्या पक्षाचे प्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे पोलिसांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करतात, यावरून महाराष्ट्र कुठे चालला आहे, हे दिसून येते. दररोज अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण होताना दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com