कारवाई करण्यापूर्वी...! शौचालय घोटाळ्याबाबत सोमय्यांचं थेट प्रधान सचिवांना पत्र

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे.
कारवाई करण्यापूर्वी...! शौचालय घोटाळ्याबाबत सोमय्यांचं थेट प्रधान सचिवांना पत्र
Kirit somaiya Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे. प्रा. मेधा सोमय्या यांच्या संस्थेच्या माध्यमातून हा घोटाळा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. त्यानंतर सोमय्या यांनी थेट नगरविकास खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांना पत्र लिहिलं आहे. तसेच सोमय्या यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्तांनाही इशारा दिला आहे.

सोमय्या यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शंभर कोटींच्या शौचालय घोटाळ्यासंबंधी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मंत्रालय कारवाई करत आहे, एफआयआरही नोंदवली जात आहे, अशा प्रकारचे विधान शिवसेना (Shiv Sena) नेत्यांनी केले आहे. पण भाजप (BJP), युवक प्रतिष्ठान, प्रा. मेधा सौमय्या, किरीट सोमय्या यांनी कोणताही घोटाळा केलेला नाही. एका बाजूला शौचालयसंबंधी खोटी कागदपत्रे दाखवून तीन कोटी नव्वद लाख बावन्न हजार रुपयांची बिले घेतली, असा उल्लेख केला जातो. त्याचसोबत 100 कोटींचा घोटाळा याचाही उल्लेख होत असतो, याची दखल घ्यावी व स्पष्टता करावी, असं सोमय्यांनी पत्रात लिहिलं आहे.

Kirit somaiya
भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल ; २७ वर्ष 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा

शंभर कोटींच्या घोटाळ्याचा आकडा कुठून आला, याबाबत एकही कागद देण्यात आलेला नाही. युवक प्रतिष्ठानच्या संचालिका प्रा. मेधा सोमय्या यांनी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. 15 ते 20 वर्षांपूर्वी शौचालयाची योजना आली होती, त्या गोष्टीला 15 ते 20 वर्ष झाले. कुठे शौचालय बांधायची, कशी बांधायची हा निर्णय स्पष्टपणे केंद्र सरकार, राज्य सरकार, एमएमआरडीए आणि संबंधित महापालिकेचा होता. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना हा नवीन प्रयोग म्हणजे शौचालय बांधून सरकारी व्यवस्थेतून द्यावे, परंतू त्याची देखभाल स्थानिक जनतेने, एनजीओने करावी, असा होता. मुंबई व आसपासच्या सात महापालिकेत हा प्रयोग 2002-04 मध्ये राबवला. त्यामध्ये युवक प्रतिष्ठानही होते, असंही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शंभर कोटींचा घोटाळा हा प्रा. मेधा सोमय्या यांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचे काही शिवसेना नेते प्रयत्न करती आहे. त्यात अधिकाऱ्यांनी आपला दुरूपयोग होऊ नये, ही प्रार्थना. आम्ही पुन्हा एका स्पष्ट करू इच्छितो की, आमच्यापैकी कोणीही कोणत्याही प्रकारचा एक दमडीचा घोटाळा केलेला नाही. ही सरकारी योजना होती. युवक प्रतिष्ठानने सामाजिक संस्थेने मदत करण्याचे काम केलेले होते. 15 वर्षात यासंबंधी कोणताही एक कागद नाही, चौकशी नाही आणि आज अचानक घोटाळा झाल्याचे वाचून दु:ख झाले. अशी नाराजी सोमय्या यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

Kirit somaiya
रायगडमध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडणार? मोठा नेता तटकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी या संपूर्ण गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करावा, अभ्यास करावा, आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्हीही संबंधित माहिती द्यायला तयार आहोता, याची नोंद घ्यावी. राजकीय किंवा अन्य दडपणाखाली सौमय्या परिवाराच्या विरूध्द गुन्हा नोंदवायचा, अशा प्रकारची कृती अधिकारी वर्ग करणार नाही, असा विश्वास सोमय्या यांनी पत्रात व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.